
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी गंगाखेड-प्रेम सावंत
गंगाखेड:तालुक्यातील मौजे मुळी येथे सामाजिक न्याय, शिक्षण, आणि बहुजन सशक्तीकरणाचे प्रणेते राजश्री शाहू महाराज यांची १५१ वी जयंती मुळी येथील बौद्ध विहारात मोठ्या उत्साहात व गौरवपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाला डॉ.अशोकराव हनवते यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्यासह केवळ साळवे, गुणवंत टोमके, विकास साळवे, साहेब साळवे, अमोल साळवे, धरबा टोमके, आम्रपाली साळवे, प्रिया टोमके, निकिता सावंत, रेखा साळवे, हेमा साळवे यांच्यासह मुळी येथील बौद्ध उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. त्यांनी कशाप्रकारे शोषित, वंचित, बहुजन समाजासाठी शिक्षण व हक्कांसाठी काम केले, याची माहिती देत आजच्या काळातही त्यांच्या विचारांची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमात उपस्थितांनी शाहू महाराजांच्या विचारांचे अनुकरण करत समाजामध्ये समता, बंधुता आणि न्याय नांदावा, या संकल्पाने एकत्र येण्याचे आवाहन केले.
शेवटी कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल आयोजकांचे उपस्थितांनी कौतुक केले. उपस्थितांनी एकत्रितपणे ‘जय शाहू, जय भीम’च्या घोषणांनी परिसर दुमदुमवून टाकला होता.