
दैनिक चालु वार्ता म्हसळा -(रायगड )प्रतिनिधी- अंगद कांबळे
म्हसळा – तालुक्यातील चंदनवाडी येथील वयोवृद्ध महिला रुक्मिणी रामजी धुमाळ वय वर्षे ६०, राहणार चंदनवाडी या दिनांक २६ जुन २०२५ रोजी दुपारी दोन वाजता म्हसळा बाजार पेठेत जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी आल्या असता त्या पुन्हा परतीचा प्रवास करत असताना भुरट्या चोराने दिवसा ढवळया वयोवृद्ध महिलेचे पिशवीतील ७००० हजार रुपये पळवून धुम ठोकल्याची घटना घडली.घटनेची खबर म्हसळा पोलिसांना मिळताच आरोपीच्या वर्णना नुसार काही अवधीतच आरोपी अल्ताफ आखलाख तालिब,वय वर्षे २८,राहणार वरवठणे याला जेरबंद केले आहे.चोरीच्या घटनेची अधिक माहिती घेतली असता फिर्यादी महिला एसटी स्थानक शेजारी असलेल्या शौचालयात लघुशंका करण्यासाठी गेली असता तीन हातातील पैशाची पिशवी पायऱ्यांवर ठेवली होती इतक्यात तेथे दबा धरून बसलेल्या अल्ताफ तालिब या चोराने ७००० हजार रुपयांची पिशवी घेऊन पोबारा केला.काही वेळातच आरडा ओरडा झाला असता आरोपी कुंभारवाडाकडे पळून जाताना अनेकांनी पाहिला.चोरीचा छडा लागताच पोलिसांनी रातोरात आरोपी अल्ताफ याला गजाआड केले आहे.आरोपीवर म्हसळा पोलिस ठाण्यात गुन्हा र.नंबर ३६/२०२५,भा.न्या.स.कलम ३०३(२) नुसार नोंद करण्यात आला आहे.आरोपीला मा. न्यायालयाने एक दिवसाची कोठडी दिली असून चोरीचा तपास पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांच्या मार्गदर्नाखाली पोलीस हवालदार आर.बी.बांगर तपास करीत आहेत.
म्हसळा पोलिसांनी चोरीच्या घटनेचा लागलीच शोध घेतला आणि आरोपीला गजाआड केले.पोलिसांच्या या कामगिरीचे म्हसळा तालुका व शहरातील नागरिकांनी कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले आहे.म्हसळा पोलीस निरीक्षक संदीप कहाळे,उपनिरीक्षक ज्ञानेश्वर एडवळे आणि त्यांचे सहकारी पोलिस पथक यांच्या कामगिरीचे अभिनंदन करताना नगर पंचायत समिती सभापती राखी करंबे आणि मान्यवर कार्यकर्ते.