दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- स्वरूप गिरमकर
( पुणे ) वाघोली : उरळगाव (ता.शिरूर) येथील शेतकरी अमोल बाळासाहेब आफळे यांच्या शेतातील १५१२किलो डाळिंब चोरट्याने पहाटेच्या सुमारास चोरून नेले. अमोल आफळे यांनी या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन अंतर्गत न्हावरे पोलिसांत फिर्याद दिली आहे.फिर्यादी अमोल आफळे यांनी आपल्या स्वत:च्या शेतात भगवा जातीचे डाळिंब लावले आहे.आता डाळिंब काढणीला आले होते. त्यातून चार पैसे मिळतील, अशी त्यांना आशा होती. आफळे यांनी दोन एकर बाग जतन केली होती. त्यांच्या दोन एकरात ६६० झाडे आहेत. चोरट्याने काही झाडे पूर्ण मोकळी केली तर काही झाडांचे थोडे थोडे डाळिंब काढून नेले आहेत.यंदा भरघोस डाळिंब निघेल अशी आफळे यांना अपेक्षा होती, पण त्यातील १लाख ५१ हजार २०० रुपये किंमतीचे डाळिंब चोरट्याने चोरून नेल्याची व्यथा त्यांनी पोलिसांसमोर मांडली.त्यांच्या शेतात यायला मुख्य रस्त्यापासून कच्चा रस्ता आहे. त्या रस्त्याने येऊन चोरट्यांनी हा डाव साधल्याचेही आफळे यांनी पोलिसांना सांगितले. —————