
दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी-अविनाश देवकते
लातूर (उदगीर) : शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, हंडरगुळी येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १५१ वी जयंती “सामाजिक न्याय दिन” म्हणून अत्यंत उत्साही वातावरणात आणि भव्य कार्यक्रमाने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक सय्यद आर. एम. हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. त्यानंतर प्रास्ताविक श्री. घटकार रामचंद्र यांनी करताना राजर्षी शाहू महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा थोडक्यात आढावा घेतला. कार्यक्रमासाठी विशेष मार्गदर्शन करण्यासाठी महात्मा फुले महाविद्यालय, अहमदपूर येथील प्रा. डॉ. सतिश ससाणे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात शाहू महाराजांच्या सामाजिक सुधारणा कार्यावर सविस्तर विवेचन केले. त्यांनी मोफत व सक्तीचे शिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन, जातीय विषमता निवारण, आंतरजातीय विवाह यासारख्या अनेक क्रांतिकारी संकल्पनांची उदाहरणांसह माहिती दिली. त्यांचे भाषण विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायक ठरले.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे पर्यवेक्षक व स्काऊट मास्टर सुगावे बालाजी यांची उपस्थिती लाभली होती. त्यांनी शाहू महाराजांच्या विचारांना विद्यार्थ्यांनी आचरणात आणण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभागप्रमुख मोमीन अजीज यांनी अत्यंत नेटकेपणाने पार पाडले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री. जाधव रविप्रकाश, मैलारे माधव, नाटकरे बालाजी, पाटील राजकुमार, गायकवाड संजय, गायकवाड भिमकिरण, कणसे व्यंकटराव, बगाडे तुकाराम, मोरे उत्तम, तसेच महिला कर्मचाऱ्यांमधून सौ. बिरादार के.के., सौ. येलाले के.व्ही., सौ. कनकुरे एम.एम., सौ. कुरूळेकर एस.एन., सौ. गायकवाड पी.एन., डॉ. नारागुडे के.पी., सौ. गुडाप्पे आर.एस., सौ. संगमवार एस.टी., सौ. भंडारे एस.जी., सौ. जवळे जे.आर., तसेच सुमय्या तांबोळी, श्रीमती बिरादार राजश्री, कासले वैभव, भोसले अभिजित, विनित सुर्यवंशी, मळभागे शिवानंद, अरविंद भोसले, माधव वाघमारे या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे गावातील युवक व युवती यांचाही उत्स्फूर्त सहभाग लाभला. संपूर्ण हॉल शाहू महाराजांच्या विचारांनी भारावलेला होता.
या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक समतेचे बीज रोवण्याचा विद्यालयाचा हा उपक्रम निश्चितच अनुकरणीय ठरला.