
दैनिक चालु वार्ता उमरगा प्रतिनिधी -मनोजकुमार गुरव
जिल्हा परिषद शाळा उच्च प्राथमिक शाळा, कंटेकुर ता. उमरगा येथे राष्ट्रीय शिक्षण हक्क अधिनियम २००९ नुसार शाळा व्यवस्थापन समितीची (SMC) निवड प्रक्रिया उत्साही वातावरणात पार पडली. सरपंच, पोलिस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष, पालक, शिक्षक आणि शाळा प्रशासन यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित सदस्यांची निवड करण्यात आली. या समितीमध्ये पालक प्रतिनिधी, शिक्षक प्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य, व शिक्षणप्रेमी प्रतिनिधी यांचा समावेश करण्यात आला आहे. मुख्याध्यापक श्री नागेंद्र सामन हे समितीचे सचिव असतील. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे वरिष्ठ शिक्षक लक्ष्मण येवते केले. निवड प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने आणि सहमतीने पार पडली. यावेळी शाळेच्या प्रगतीसाठी समितीचे महत्त्व, जबाबदाऱ्या आणि नियोजन याबाबतही माहिती देण्यात आली. नवनिर्वाचित समिती अध्यक्ष म्हणून श्री. वसंत धुमाळ, उपाध्यक्ष श्रीमती. राधिका कलबुर्गे, शिक्षण तज्ञ श्री. पांडुरंग धुमाळ, शिक्षक प्रतिनिधी श्री. लक्ष्मीकांत पटणे व विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून तनुजा जमादार, रोहित निंबर्गे आणि सदस्य म्हणून कविता जमादार, बालाजी काळे, प्रियंका विभुते, रसूल मुजावर, राजश्री निंबर्गे, सुलतानप्पा बेळंबे, महादेव गायकवाड सर्वानुमते निवड करण्यात आली. निवडीनंतर नवनियुक्त अध्यक्षांनी शाळेच्या विकासासाठी बांधिलकीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. मुख्याध्यापकांनी सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, “शाळेचा सर्वांगीण विकास, गुणवत्तापूर्ण शिक्षण व विद्यार्थ्यांच्या हितासाठी पालक आणि शिक्षक यांच्यातील सुसंवाद अत्यंत आवश्यक आहे. SMC हे त्याचे प्रभावी माध्यम आहे.” कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी लतिफ लदाफ, विठ्ठल कुलकर्णी, तनुजा गाढवे चित्ररेखा दंडे व पालकवर्गाने मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाच्या शेवटी शिवकुमार स्वामी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.