
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- स्वरूप गिरमकर
( पुणे ) वाघोली : कुणाच्याही मदतीसाठी सदा तत्पर आणि हसतमुख चेहऱ्याचा धनी म्हणजे उरळगावचे मा सरपंच रामभाऊ बांडे.. त्याच्या मदत करण्याच्या स्वभावामुळे आज त्यांना दीर्घ आजारामुळे रक्तदानाची गरज आहे. असे आवाहन त्यांचे बंधू सोमनाथ बांडे व आनंदऋषीजी ब्लड सेंटर यांनी केले होते. या आवाहनानंतर काही क्षणात त्यांच्यासाठी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात उरळगावचा मित्र परिवार मदतीला धावला.आनंदात तर सर्वच सहभागी होत असतात, पण संकटसमयी उरळगावचा मित्र परिवार आपल्या मित्रासाठी धावला, ही प्रेरणा समाजासाठी खरंच एक वेगळा संदेश देणारी आहे.त्यांच्यासाठी उरळगाव ग्रामस्थ आणि आनंदऋषीजी ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करून तब्बल ७१ बॅग रक्तदान करून मित्र रामभाऊ बांडे यांस आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोत असा संदेश दिला. मानवतेच्या कल्याणार्थ रक्तदान सर्व श्रेष्ठ दान आहे जे आपण कोणत्याही निमित्ताने करू शकतो असा रक्तदात्यांनी या कार्यक्रमातून संदेश दिला.
यावेळी सोमनाथ बांडे ,निलेश सात्रस,भिमराव कुदळे, सागर गिरमकर पाटील,संतोष काका सात्रस,अमोल बांडे,पंढरीनाथ बांडे,भाऊसाहेब कोकडे,ऋषिकेश बांडे, अशोक आण्णा कोळपे,समशेर शेख,सागर कोळपे तुषार सात्रस,गौरव सात्रस,संतोष जाधव, अय्यान सय्यद यांचे विशेष सहकार्य लाभले.कुंडलिक कोकडे, मयूर बांडे यांनी रक्तदात्यास अल्पोपहार दिला.तसेच निलेश अनिल सात्रस यांनी रक्त संकलन करण्यासाठी आलेल्या डॉ.व्यवस्थापन यांची जेवणाची व्यवस्था केली .
रक्तदान हे केवळ दान नसून आरोग्याचे वरदान आहे. रक्तदानातुन कुणाचा तरी जीव वाचणार आहे ही भावना मनात ठेऊन सर्वांनी रक्तदान करणे काळाची गरज आहे..
– भिमराव कुदळे,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विभाग प्रमुख जिल्हा परिषद गण