
दैनिक चालु वार्ता वर्धा- उपसंपादक -अवधूत शेंद्रे
—————————————-
—————————————-
वर्धा- आष्टी :- तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या
(वर्धपुर) वडाळा शहीद जन्मभुमीत निंभोरकर परिवारातील दुसऱ्या पिढीत भारत मातेच्या रक्षणार्थ सेवा देण्याचा मान कायम राखत भारतीय वायुसेना मध्ये फ्लाईंग ऑफीसर म्हणून ॲड. देवश्री सुधिर निंभोरकर यांची निवड झाली यासाठी आष्टी तालुक्यासह पंचक्रोशीतून देवश्री हिचेवर अभिनंदनचा वर्षाव होत आहे देवश्री हीने नामांकीत नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी पवई , मुंबई येवून ५ वर्षाची बी.ए. एलएलबी पदवी प्राप्त केली आहे त्यानंतर इंडियन एअर फोर्स अकॅडमी हैदराबाद येथून फ्लाईंग ऑफीसर म्हणुन देवश्री यांची भारतीय वायुसेनेत निवड झाली वायुसेनेत फ्लाईंग ऑफिसर या पदावर फारच कमी लोक उत्तीर्ण होतात असे म्हटले जाते संपूर्ण भारतामधुन ३५ मुलींचे जून २०२४ मध्ये सिलेक्शन झाले ( एफकेट) इंडियन एअर फोर्स कॉमन टेस्ट मध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर सर्विस सिलेक्शन बोर्ड हैदराबाद एअर फोर्स अकॅडमी मार्फत एक वर्ष मिलीटरी ट्रेनिंग पुर्ण करणाऱ्या ३५ पैकी २८ मुलीच उत्तीर्ण झाल्यात त्यातील केवळ महाराष्ट्रातील दोन आहेत त्यापैकी एक देवश्री आहेत अतिशय मेहनत, जिद्द व चिकाटीने प्रयत्न करुण देवश्री यांनी यश संपादन केले आपल्या यशाचे श्रेय निंभोरकर कुटुबातील सदस्यांना देते.विशेष म्हणजे देवश्री सेवानिवृत्तग्रुप कॅप्टन सुधिर रामरावजी निंभोरकर यांची मुलगी आहेत तर सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल राजेन्द्र निंभोरकर व मराठा शिक्षण संस्था अध्यक्ष दिलीप निंभोरकर यांची पुतनी आहेत वडाळा या गावातील सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल राजेन्द्र निंभोरकर यांचे परिवारातील ५ सदस्य भारत मातेच्या रक्षणार्थ तीनही दलामध्ये ३ भाऊ होते त्यामध्ये सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल राजेन्द्र रामरावजी निंभोरकर सेनादल इंडियन आर्मी व वायुसेनेत मध्ये सेवानिवृत्त ग्रुप कॅप्टन सुधिर रामराव निंभोरकर आणि नौसेनेत मध्ये सेवानिवृत्त स्व. विलास रामराव निंभोरकर हे सुद्धा कॅप्टन होते त्यांचे वडील स्व.रामराव निंभोरकर हे एक आदर्श शिक्षक (जि.प.) होते . आणि त्यांनी आपले तीनही मुले भारत देशाच्या रक्षणार्थ नौदल वायुदल आणि भुदल या तिन्ही जगात पाठवीली आणि अतिशय सरळ व साधेपणा त्यांच्या अंगी होता गावातील न्यायदानाचे कार्य करत सेवा करत होते पुढे त्यांचेच पावलावर पाऊल ठेवत तो सेवेचा वारसा कायम सुरु आहे आता तिनही भाऊ निवृत्त झाले असून सेवानिवृत्त लेप्टनंट जनरल राजेन्द्र निंभोरकर याची मुलगी सेनादलमध्ये मेजर पदावर डॉक्टर आहेत आणि सेवानिवृत्तग्रुप कॅप्टन सुधिर निभोरकर यांची मुलगी देवश्री सुधिर निंभोरकर फ्लाईंग ऑफिसर म्हणून निवड झाल्यामुळे देशाच्या सेवेत निंभोरकर परिवाराचा दुसऱ्या पिढीने वारसा कायम करत ठेवत वर्धपूर वडाळा शहीद भूमीचा, आष्टी तालुक्याचा आणि वर्धा जिल्हयासह महाराष्ट्राचा मान उंचविला त्याबद्दल देवश्री यांचेवर विविध क्षेत्रातील मान्यवरासह गावकऱ्यांनी कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव केला