
दैनिक चालू वार्ता – शिरूर प्रतिनिधी -इंद्रभान ओव्हाळ
शिरूर( पुणे ) माझी जिवेची आवडी पंढरपुरा नेईन गुढी या उक्तीप्रमाणे गेली ५२ वर्षे अविरतपणे पंढरपूरची पायी वारी करणाऱ्या फलटण येथे श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे औचित्य साधून मांडवगण फराटा येथील एक आदर्श व्यक्तिमत्व बाळासाहेब नाना फराटे यांचा श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे विश्वस्त भावार्थ देखणे महाराज ह. भ. प. पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. बाळासाहेब नाना फराटे गेली ५२वर्ष श्री क्षेत्र आळंदी ते पंढरपूर पायी वारी करीत आहे. ही फार दुर्मिळ आणि असामान्य घटना आहे. खऱ्या अर्थाने पांडुरंगाची नाना वर कृपा आहे. असे गौरवोद्गार भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप दादा वळसे पाटील यांनी व्यक्त केले. याप्रसंगी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादा पाटील फराटे घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक बाबासाहेब फराटे, संतोष नाना फराटे, दिलीपराव लोखंडे, निलेश इथापे, मच्छिंद्र फराटे , हनुमंत घाडगे , युवा उद्योजक राहुल फराटे उपस्थित होते.