
दैनिक चालु वार्ता माजलगाव प्रतिनिधी- नाजेर कुरेशी.
शहरातील नागरी समस्या संदर्भात असणाऱ्या प्रश्नांसह विविध मागण्या लावून धरत आंबेडकरी विचार मोर्चाच्या वतीने सय्यद सलीमबापू यांनी सोमवार दि.30 रोजी सकाळी नगरपरिषद कार्यालय समोर रास्ता रोको केला.
यावेळी आंबेडकरी विचार मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी नगर परिषदेच्या कामकाजाविषयी निषेधाच्या घोषणा करत मुख्याधिकाऱ्यांना ताळ्यावर आणले.
माजलगाव नगर परिषदेमध्ये कार्यरत असलेले प्रशासक तथा मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांचा मनमानी कारभार सुरू आहे.
जनतेची अनेक कामे खोळंबली आहेत.परंतु पालिका प्रशासन गेंड्याची कातडी पांघरून आहे.या
धोरणाविरुद्ध समाजसेवक व आंबेडकरी विचार मोर्चाचे मराठवाडा अध्यक्ष सय्यद
सलीमबापू यांनी एल्गार पुकारला. संघटनेच्या वतीने वतीने सोमवार दि.30 जुन 2025 रोजी नगर परिषदेसमोर रास्ता रोको केला.
यावेळी कार्यकर्त्यांनी नगर परिषदेच्या ढिसाळ कामाचा निषेध व्यक्त करत घोषणाबाजी केली. शहरातील नगरपरिषद हद्दीमध्ये किरायदार,भोगवटदार,बेघर या गोरगरीब लोकांना घरकुल देण्यात यावे.आलेले नाही. याला मंजुरी देण्यात यावी.आझाद नगर येथे अर्धवट रस्ता तयार करण्यात आलेला आहे,तो पूर्ण करण्यात यावा.सन २०२० ते २०२५ या वर्षात नगरपरिषद माजलगाव यांनी किती गुंठेवारी केल्या याची यादी देण्यात यावी.किती लोकांना ओपनस्पेच्या बोगस पिटीआर देण्यात आल्या याची माहिती देण्यात यावी.शहरात किती ओपनस्पेस,डीपीरोड आहेत याची माहिती देण्यात यावी.इत्यादी मागण्या यावेळी कार्यकर्त्यांनी लावून धरल्या.सय्यद सलीमबापू यांच्या नेतृत्वाखाली आंबेडकरी विचारू मोर्चाच्या वतीने केलेल्या
भव्य रास्ता रोकोने धास्तावलेले पालिका प्रशासन ताळ्यावर आले.
दरम्यान प्रशासनाच्या वतीने मागण्यांसंदर्भात ठोस निर्णय घेण्याचे अभिवचन आंदोलकांना दिले.या आंदोलनात आंबेडकरी विचार मोर्चाचे मराठवाडा अध्यक्ष
सय्यद सलीमबापू,एडवोकेट सय्यद अल्ताफ,यांच्यासह संघटनेचे शेकडो पदाधिकारी सहभागी होते.