
दैनिक चालू वार्ता -शिरूर प्रतिनिधी -इंद्रभान ओव्हाळ
शिरूर (पुणे)
या बैठकीसाठी सामाजिक कार्यकर्ते निलेश मंदा यशवंत वाळुंज यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; गेल्या काही महिन्यांपासून ते नियम, कायदे आणि शासन आदेश दाखवत प्रशासनाला जागं करण्याचे कार्य करत होते. त्यांनी फक्त तक्रारी न करता, ठोस आणि कायदेशीर स्वरूपात मागण्या सादर करून तसेच २००४ च्या शासन परिपत्रकानुसार या बैठकीसाठी प्रशासनाला तयार केले.*
“शिरूर तालुक्यातील अवैध दारू, ताडी आणि गुटखा या व्यसनांचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या विरोधात सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि सजग नागरिक सातत्याने आवाज उठवत होते. दिनांक २० जून २०२५ रोजी दुपारी ०३:०० वा , तहसिलदार शिरूर बाळासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली, शिरूर, रांजणगाव व शिक्रापूर येथील पोलीस निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक, पत्रकार बांधव व काही नागरिक/सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत “तालुकास्तरीय अवैध दारू प्रतिबंध समितीची” बैठक पार पडली.
सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी बैठकीत मांडलेल्या मुख्य कायदेशीर मागण्या – सामाजिक हिताच्या रक्षणासाठी ठाम भूमिका:
१) आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई यांनी ०८सप्टेंबर २०२० मध्ये निर्गमित केलेल्या परिपत्रकातील तरतुदींची/शासन आदेशांची अंमलबजावणी काटेकोरपणे करणे.
२) अवैध दारू/ताडी/गुटखा विक्री करणाऱ्यांवर हद्दपारी तसेच MPDA अंतर्गत कारवाई करणे.
३) ज्या हॉटेल/ढाब्यांमध्ये अवैध दारू विक्री करणारे किंवा शासकीय परवाना नसताना दारू विक्री करणारे सापडतील किंवा परवाना नसताना दारू पिणारे लोक सापडतील त्या हॉटेल मालकावर गुन्हा दाखल करण्यात येवून परवाना कायमचा रद्द करणे, तसेच ग्रामपंचायत/नगरपालिका यांनीही “NOC” रद्द कर करणे
४ )ज्या अधिकाऱ्यांच्या हद्दीत हे अवैध धंदे सुरू आहेत, त्या संबंधित पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी/कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करणे
वाळुंज यांनी सादर केलेल्या शासन तरतुदींचा अध्यक्षांनी गांभीर्याने विचारात घेत सदर शासन आदेशांचे काटेकोर पालन करून तालुक्यातील ह्या अवैध बाबी पूर्णत: बंद कराव्यात, अशा स्पष्ट सूचना समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार शिरूर यांनी तालुक्यातील तीनही पोलीस निरीक्षक व रा.ऊ.शु. निरीक्षक यांना दिल्या.
या बैठकीदरम्यान चिंचणी,कर्डेलवाडी,अन्नापुर , शिरूर येथील नागरिकांनी दारूबंदी होणेबाबत तक्रारी केल्या, ह्या अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पत्रकार बांधवांनीही काही ठोस सूचना मांडल्या, तसेच अनेक परवाना धारक नियम डावलून अल्पवइन मुलांना देखील मद्य विक्री करत असल्याच्या तक्रारी मांडल्या गेल्या,
“वाळुंज यांनी दारूबंदीबाबत केलेल्या पत्रव्यवहार आणि याबाबतचे महत्त्वाचे शासन निर्णय/परिपत्रक/ग्रा.स.ठराव इत्यादीसह तब्बल २३२ पानांची संचिका तहसिलदार यांना दिली”
अधिकार्यांनी या सर्व बाबी समजून घेऊन सकारात्मक प्रतिसाद दिला आणि लवकरात लवकर योग्य कार्यवाही होईल,असे आश्वासन दिले.
यावेळी तालुका समितीचे अध्यक्ष तथा तहसिलदार बाळासाहेब म्हस्के, सदस्य सचिव शिरूर पोलिस निरीक्षक संदेश केंजळे, पोलिस निरीक्षक रांजणगाव महादेव वाघमोडे, पोलीस निरीक्षक शिक्रापूर, सदस्य रा.ऊ.शु. निरीक्षक शिरूर माधव झेंडे,तसेच सहायक पोलिस निरीक्षक कारंडे, तहसिल शिरूर फौजदारी सं-एस एम धस, दै.सकाळ शिरूरचे पत्रकार नितीन बारवकर,दै.प्रभातचे पत्रकार तथा ग्राहक सं.स.तालुका अध्यक्ष अरुणकुमार मोटे, आपला आवाज चे पत्रकार रवींद्र खुडे, दै.सकाळ चे पत्रकार सागर रोकडे दैनिक चालू वार्ता चे पत्रकार इंद्रभान ओव्हाळ, एड.प्रवीण बी कर्डिले , अनिल चौधरी, संतोष शिंदे, प्रदीप दसगुडे, संजय कुरंदळे,विशाल शिंदे, ग्रा.पं.सदस्य केशव शिंदे ,मनसे चे अविनाश घोगरे, आदी मान्यवर उपस्थित होते
—————————————-+——
ही बैठक म्हणजे जनतेच्या संयमित संघर्षाला मिळालेला शासकीय प्रतिसाद आहे.शिरूर तालुक्यातील भविष्यासाठी ही एक आशादायक आणि निर्णायक घडी ठरते आहे.शासन आदेश फक्त कागदांवरच न राहता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होते की नाही याची जबाबदारी तालुका समितीची असून याबाबत शासनास कळवणे बंधनकारक असून, दरमहा न चुकता सदर बैठक होणे आवश्यक आहे. तालुक्यातील इतर नागरिकांनीही तालुका समितीकडे तक्रारी मांडाव्यात, ह्या लढ्यासाठी नागरिकांनी संघटित व्हावे
✍🏻 निलेश मंदा यशवंत वाळुंज
(सामाजिक कार्यकर्ता / व्हिसल ब्लोअर)