
दैनिक चालू वार्ता धाराशिव/प्रतिनिधी -समीर मुल्ला
धाराशिव पोलीस जिल्हा विशेष शाखा, येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास (काका) घुगे हे वयोमानाने सोमवार (दि 30 ) रोजी सेवावृत्त झाल्याने धाराशिव पोलीस जिल्हा विशेष शाखेच्या वतीने आहे.श्रीनिवास (काका) घुगे यांचा सहपत्नीक सत्कार करुन निरोप देण्यात आला
पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास (काका) घुगे हे दि.01.08.1987 रोजी परभणी जिल्हा पोलीस दलात भरती झाले होते. परभणी पोलीस दलात ADS, वाहतूक शाखा परभणी व पोस्टे कळमनुरी तसेच धाराशिव जिल्ह्यात पोलीस स्टेशन उमरगा, धाराशिव शहर, बेंबळी, धाराशिव स्थानिक गुन्हे शाखा(LCB), जिल्हा विशेष शाखा(DSB),तसेच मंदिर चौकी, तुळजापूर व दहशतवाद विरोधी पथक (ATS)छत्रपती संभाजी नगर येथे उल्लेखनीय असे कर्तव्य बजावले आहे. उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई या सन्मानचिन्हाने गौरविण्यात आले आहे. त्यांचा एक उत्कृष्ट हाॅलीबाॅल खेळाडू म्हणून नाव लौकीक केले आहे सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास (काका) घुगे हे सामाजिक, संयमी, कर्तव्यनिष्ठ नेतृत्वा संपन्न व्यक्तिमत्व असलेले श्रीनिवास घुगे यांना सेवानिवृत्ती बाबत निरोप देवुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन रवाना करण्यात आले
सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक श्री.श्रीनिवास (काका) घुगे यांच्या सेवानिवृत्त निरोप समारंभ कार्यक्रम च्या वेळी धाराशिव पोलीस जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.आमोद भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक नवनाथ होमकर, पोलिस उपनिरीक्षक प्रदिप साळूंके, बाळासाहेब दळवी ,ईरशाद हक्क, महीला सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किरण डोके, पोलिस हवालदार उपेंद्र कुलकर्णी, किरण मुंडे, महेश कचरे, योगेश सुर्यवंशी, गोविंद पवार नितीन पोतदार, तन्वीर पिरजादे, विशाल बिदे, गणेश रोडे, महिला पोलिस हवालदार विमल साळुंके-कचरे, महिला पोलिस नाईक सुरय्या पठाण,सारीक जाधव, श्रीमती रिटे तसेच इतर सहकारी यांचे उपस्थीत होते