दैनिक चालु वार्ता उमरी प्रतिनिधी-श्रीनिवास मुक्कावार
सन २०२५ ते २०३० या कालावधीतील निवडणुकीसाठी ग्रामपंचायत आरक्षण सोडत प्रक्रिया १ जुलै रोजी उमरी तहसिल कार्यालयाच्या सभागृहात पार पडली.. ही प्रक्रिया उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे यांच्या अध्यक्षतेखालील व तहसीलदार प्रशांत थोरात, नायब तहसीलदार संजय सोलनकर, संजय देवराये यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.
विविध ग्रामपंचायतींना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला व सर्वसाधारण खुला प्रवर्ग यांसाठी आरक्षित करण्यात आले आहे. यामध्ये ना.मा.प्र. (नागरी प्रतिनिधी) प्रवर्गासाठी आरक्षित ग्रामपंचायतीः सामान्य प्रवर्गासाठी आरक्षित
ग्रामपंचायती झ कावलगुडा बुद्रुक, नागठाणा बुद्रुक, सोमठाणा प.उ., वाघाळा, ढोलउमरी, हातणी, धानोरा बु., अब्दुलापुर आधी सोडत तर महिलांसाठी आरक्षित ग्रामपंचायती शिंगणापुर, जामगाव, तुराटी, मनुर, जिरोणा, शेलगाव, बेलदरा/मियादादपुर, फुलसिंगनगर/बसंतनगर आधी सोडत. सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी आरक्षित ग्रामपंचायती पुरुषांसाठी खुला प्रवर्ग गोळेगाव, बिजेगाव, नागठाणा खुर्द,, तळेगाव, गोरठा, इळेगाव, करकाळा, सावरगाव दक्षिण.,
बोरजुनी, मंडाळा, बोयी, हस्सा, हंडा ग.प. आधी सोडत तर महिलांसाठी खुला प्रवर्ग
भायेगाव, शिवनगाव, आस्वलदरी, सिंधी, बळेगाव, बोळसा गंगा. पट्टी., काबलगुडा खुर्द, रहाटी खुर्व., कुदळा, मोखंडी जाहगिर, वाधलवाडा, महाटी/बेंडाळा, कौडगाव आधी सोडत तर
अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षणः सामान्य प्रवर्गासाठी आरक्षित ग्रामपंचायती झा हिरडगाव, रामखडक, चिचाळा पट्टीउमरी, ईश्वरनगर/दुर्गानगर,
इज्जतगाव/अमदापुर आधी आरक्षण, तर महिलांसाठी आरक्षित ग्रामपंचायती सावरगाव कला, पळसगाव, बितनाळ, मणिपूर, बोळसा बुद्रुक./खुर्द, हुन्डा प.उ. आधी सोडत तर अनुसुचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षणः सामान्य प्रवर्गासाठी हंगीरगा, निमटेक सोडण्यात आले तर महिलांसाठी आरक्षित : कारला, कळगाव, शिरूर या नव्या आरक्षण यादीमुळे उमेदवारांना आगामी निवडणुकीसाठी आपले नियोजन करण्यास मदत होणार आहे. संदर आरक्षण हे लहान मुलांना चिठ्ठया काढून प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यात आली असून, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्व घटकांचा समावेश साधण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे प्रशासनाने सांगितले.