
दैनिक चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधी -विशाल खुणे
( पुणे )
. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे तोरणा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य मा. अमर एकनाथ बनसोडे हे अखंड 32 वर्षाच्या सेवेनंतर शासकीय नियत वयोमानानुसार 30 जून रोजी सेवानिवृत्त झाले. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. अजित पवार उपाध्यक्ष एडवोकेट राजेंद्र घाडगे मानद सचिव एडवोकेट संदीप कदम,
खजिनदार एडवोकेट मोहनराव देशमुख सहसचिव ए एम जाधव यांनी सेवापूर्तीच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या सेवा गौरवपूर्ती कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपसचिव आदरणीय एल एम पवार साहेब ,
एस पी कॉलेजचे प्राचार्य ,
डॉक्टर सुभाष खंडागळे,
सिंहगड टेक्निकल कॉलेजचे प्रोफेसर डॉक्टर प्रफुल बनसोड विविध शाखांचे प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपसचिव आदरणीय एल एम पवार साहेब यांनी प्राचार्य श्री बनसोडे यांच्या कार्याचा उल्लेख करताना त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाचे कौतुक केले.
ब्रिटिश कौन्सिलच्या माध्यमातून भोर आणि वेल्हा तालुक्यातील शिक्षकांना प्रशिक्षण दिले.
संस्थेतील शिक्षकांसाठी कार्यशाळांचे आयोजन केले. विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .
क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांना यश संपादन करण्यासाठी मार्गदर्शन केले.
संस्थेच्या जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे नियोजनामध्ये अमर बनसोडे यांचा मोलाचे सहकार्य लाभलं. त्यामुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले.
असे हे बहुआयामी व्यक्तिमत्व संस्थेतून निवृत्त होताना त्यांची पदोपदी विद्यार्थ्यांना आठवण राहील आणि यापुढेही श्री बनसोडे सर यांनी विद्यार्थ्यांसाठी कार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
प्राचार्य मा.अमर बनसोडे यांचे बी .एड.चे मित्र श्री राजेंद्र पायगुडे यांनी बनसोडे सरांच्या विषयी अतिशय वास्तववादी चित्र उभे करून सरांनी कशा पद्धतीने या प्राचार्य पदापर्यंत यश संपादन केले याची माहिती दिली .
पदाधिकाऱ्यांनी अशा गुणवंत शिक्षकांचा विचार करून त्यांना संस्थेमध्ये संधी देण्याची विनंती श्री राजेंद्र पायगुडे यांनी केली.
एस .पी .कॉलेज चे उप प्राचार्य डॉ .सुभाष खंडागळे यांनी प्राचार्य श्री अमर बनसोडे यांचा विद्यार्थी दशे तील प्रवास स्पष्ट करताना अमर अतिशय प्रामाणिक आणि कष्टाळू विद्यार्थी राहिलेला आहे . इंग्रजी विषय त्यांच्या अतिशय आवडीचा राहिलेला आहे आणि तो आज प्राचार्य पदावरून निवृत्त होत आहे याचे कौतुक आहे अशा शब्दात अमर बनसोडे सर यांचे अभिनंदन केले
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवणारे विद्यालय, तसेच शैक्षणिक मूल्यमापन अभियान अंतर्गत तालुक्यामध्ये प्रथम व जिल्ह्यामध्ये तृतीय क्रमांक मिळवलेले तोरणा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अमर बनसोडे हे सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या कालावधीमध्ये अनेक उपक्रमांमध्ये विद्यार्थी सहभागी झाले आणि तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये एक नावलौकिक मिळवला .
इयत्ता दहावी व बारावी एसएससी बोर्ड परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला त्याबद्दल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी प्राचार्य श्री अमर बनसोडे यांचे अभिनंदन केले. प्राचार्य माननीय अमर बनसोडे यांनी मनोगत व्यक्त करताना त्यांच्या आर्थिक अडचणीच्या परिस्थितीमध्ये त्यांच्या बंधूंनी त्यांना दिलेली साथ आणि त्यांनी केलेलं आज्ञापालन यामुळे त्यांना यश मिळवता आलं शिक्षण पूर्ण करतात याची याचा उल्लेख केला तसेच जिद्द आणि चिकाटी यामुळे आपल्याला आवडता क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मिळाली.
सर्व सेवा जरी ग्रामीण भागात झाली तरी विद्यार्थ्यांसाठी काम केल्याचे समाधान आणि आनंद वाटला.
सर्व शालेय शिक्षण शहरामध्ये झालं असलं तरी 32 वर्षाची अखंड सेवा ही ग्रामीण भागात करण्याचे भाग्य लाभले .
काही सुखदुःखाच्या प्रसंगी विद्यालयातील शिक्षकांनी साथ दिली .
कुटुंबाने साथ दिली .
पत्नीने वेळोवेळी मोलाची साथ दिली त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी काम करताना कुठली अडचण आली नाही.
मुलं उच्चशिक्षित झाले .
चांगल्या कोर्सला त्यांची निवड झाली या शाळेतून जाताना मन भरून येत आहे आणि यापुढे विद्यार्थ्यांसाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली.
प्राचार्य अमर एकनाथ बनसोडे यांच्या सेवापूर्ती गौरव समारंभामध्ये त्यांचे त्यांची पत्नी, बंधू ,चिरंजीव कन्या नातेवाईक उपस्थित होते . त्यांचे कन्या कुमारी सायली येणेही मनोगतामध्ये सर्व शिक्षकांचे आभार मानले वडिलांनी केलेल्या संस्काराची शिदोरी पाठीशी ठेवून यश मिळवत राहावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
विद्यालयातील सर्व शिक्षकांनी सर्वांनी अतिशय सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केलं. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजीव चांदगुडे यांनी केले तर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार श्री पाटील सर यांनी मानले.