
राज्यात पहिलीच्या इयत्तेपासून हिंदी भाषेची सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे दोन्ही शासकीय आदेश रद्द करण्यात आले आहेत. महायुती सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर जल्लोष करण्यासाठी शिवसेना (ठाकरे) व मनसेच्या वतीने आज (५ जुलै) विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आले आहे.
वरळीतील (मुंबई) एनएससीआय डोम येथील या मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. राज्यात हिंदी सक्ती करण्याचा प्रयत्न हा मुंबई वेगळी करण्याच्या दृष्टीने टाकलेले पाऊल होते, असे राज ठाकरे म्हणाले आहेत. या निर्मयाच्या माध्यमातून त्यांनी हा विषय चाचपडून पाहिला असे राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे काय म्हणाले?
सत्ताधाऱ्यांना नेमकं काय आणि कोणासाठी करायचं आहे? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. राज ठाकरे म्हणाले की, “हिंदी भाषा ही दोनशे वर्षांपूर्वीची भाषा आहे, महाराजांच्या काळात देखील नव्हती. कशासाठी आणि कोणासाठी आणि नेमकं काय करायचं आहे? यांनी फक्त चाचपडून पाहिलं. मुंबई स्वातंत्र्य करता येते का याच्यासाठी अगोदर थोडंस भाषेला डिवचून बघू, महाराष्ट्र शांत राहिला तर पुढे ते पाऊल टाकू. कोणाची माय व्यालीय त्यांनी महाराष्ट्राला, मुंबईला हात घालून दाखवावा. काय मजाक वाटला काय? आम्ही शांत आहोत याचा अर्थ गां** नाहीयोत.