दैनिक चालू वार्ता उपसंपादक धाराशिव -नवनाथ यादव
धाराशिव/भूम (प्रतिनिधी) –
श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव यांच्या ५६व्या पायी पालखी सोहळ्याचे भूम नगरीमध्ये शतकोत्तर भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. टाळ मृदंगाच्या गजरात, “गण गण गणात बोते”च्या घोषात संपूर्ण शहर हरखून गेले होते.
पावन दर्शनासाठी शहरवासीयांनी रस्त्यावर उभे राहत श्रद्धेने पालखीचे स्वागत केले. सर्वत्र फुलांचे सडे, रांगोळ्यांची सजावट आणि भक्तांची ओसंडून वाहणारी गर्दी दिसून आली. ढोल-ताशांच्या निनादात, पालखी ज्या ज्या रस्त्यांवरून गेली, त्या त्या परिसरात उत्साह ओसंडून वाहताना दिसला.
याप्रसंगी मा.नगराध्यक्ष विकासरत्न संजय गाढवे आणि माजी नगराध्यक्षा सौ. संयोगिताताई गाढवे यांनी सपत्नीक श्रींच्या पालखीचे दर्शन घेतले आणि गजानन महाराजांचे कृपाशीर्वाद प्राप्त केले.यावेळी युवा नेते, साहिल उद्योग समुहाचे साहिल गाढवे, उद्योजक संजय साबळे, युवा उद्योजक सुरज गाढवे, रणजित साळुंके, राम बागडे, बाळासाहेब अंधारे, सुशेन जाधव, सुनील थोरात, बालाजी माळी, उद्योजक रणजित साळुंके, यांच्या सह भूम नगरपालिकेचे नगर अभियंता गणेश जगदाळे, व नप भूम चे अन्य कर्मचारी यांच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले.या दिव्य सोहळ्यास साक्षी राहण्यासाठी अनेक सामाजिक, धार्मिक संस्था, विविध मान्यवर, नगरसेवक, तसेच हजारो भाविक उपस्थित होते. या आगळ्यावेगळ्या सोहळ्यामुळे भूम नगरीत भक्तीचा महासागर उसळल्याचे दृश्य पाहायला मिळाले.
