
जरांगेंच्या आंदोलनावरही प्रश्न…
नाशिक: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याविषयी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, मुंबई महापालिका वगळता अन्य ठिकाणी ठाकरे गटाची आणि मनसेची युती होण्याची शक्यता कमी दिसते, असे भाकीत अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केले.
महायुतीतही निवडणूक लढविण्याविषयी स्थानिक पातळीवर त्या-त्या स्थितीनुसार काही वेगळे निर्णय घेतले जाऊ शकतात, असेही भुजबळ म्हणाले.
सर्वच कार्यकर्त्यांना उमेदवारीची अपेक्षा असते असे सांगत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या महायुतीत काही ठिकाणी एकत्र, तर काही ठिकाणी वेगळे लढू, या विधानाचा भुजबळांनी दाखला दिला. प्रत्येक पक्षात कार्यकर्त्यांची मनस्थिती अशीच आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. मराठा नेता मनोज जरांगे पाटील यांच्या आगामी आंदोलनाविषयी विचारले असता, भुजबळ म्हणाले, लोकशाहीने प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळे प्रत्येक जण आंदोलन करू शकतो, मात्र जरांगे आता कशासाठी आंदोलन करताहेत, हे काही कळाले नाही. कारण मराठा समाजाला वेगळे आरक्षण मिळाले असून, राज्य सरकार न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबईत डान्स बार बंद आहेत. डान्स बार आपल्याकडे नकोत, हे मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरले आहे. त्यामुळे कोणी असे प्रकार करीत असेल, तर ते थांबले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत भाष्य करणे यावेळी भुजबळांनी टाळले.
मंत्री झाल्यानंतर पंधरा दिवसांनी मला सातपुडा निवासस्थान देण्यात आले.आता राहायला जायचे म्हटल्यावर एखादे घर खाली असेल, तरच आपण जाऊ शकतो. तेथे कोणी राहत असेल तर आपण त्यांना कसे काय बाहेर काढणार? असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, मला दिलेल्या बंगल्यात राहणारे आमचेच सहकारी आहेत. मी अजून त्यांना एका शब्दानेही बोललेलो नाही. आता मुख्यमंत्री आणि इतर मंडळी त्यावर चर्चा करतील. ते काय निर्णय घेतील, याची मला कल्पना नाही. बंगला खाली झाला की, राहायला जाईन, असे अजितदादांना सांगितले आहे. ते माझेच सहकारी असल्याने तक्रार करणार नाही. उलट दुसरे छोटे घर मिळाले तरी हरकत नाही. यावर मी जास्त चर्चा करणार नाही, असेही भुजबळांनी यावेळी स्पष्ट केले.
त्यांना घरातून कसे बाहेर काढणार ?
मंत्री झाल्यानंतर पंधरा दिवसांनी मला सातपुडा निवासस्थान देण्यात आले. आता राहायला जायचे म्हटल्यावर एखादे घर खाली असेल, तरच आपण जाऊ शकतो. तेथे कोणी राहत असेल तर आपण त्यांना कसे काय बाहेर काढणार? असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, मला दिलेल्या बंगल्यात राहणारे आमचेच सहकारी आहेत. मी अजून त्यांना एका शब्दानेही बोललेलो नाही. आता मुख्यमंत्री आणि इतर मंडळी त्यावर चर्चा करतील. ते काय निर्णय घेतील, याची मला कल्पना नाही. बंगला खाली झाला की, राहायला जाईन, असे अजितदादांना सांगितले आहे. ते माझेच सहकारी असल्याने तक्रार करणार नाही. उलट दुसरे छोटे घर मिळाले तरी हरकत नाही. यावर मी जास्त चर्चा करणार नाही, असेही भुजबळांनी यावेळी स्पष्ट केले.
भुजबळ म्हणाले…
महायुतीतही निवडणूक लढविण्याविषयी स्थानिक पातळीवर वेगळे निर्णय
जरांगे कशासाठी आंदोलन करीत आहेत, कळाले नाही
डान्स बार सुरू असतील तर ते थांबले पाहिजेत
बंगला खाली झाला की रहायला जाईन