दैनिक चालु वार्ता वर्धा – उपसंपादक-अवधूत शेंद्रे
—————————————-
—————————————-
वर्धा – आष्टी :- ऑपरेशन सिंदूरमुळे भारतीय सैन्याची शक्ती जगाला समजली.पहलगाममधे दहशतवाद्यांनी अतिशय निर्घृणपणे पर्यटकांची हत्या केली. त्यामुळे दहशतवाद्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवलं. यात दहशतवाद्यांचे ९ तळ उद्ध्वस्त करण्यात आले,आणि जगाने पाहीले हा उत्तर देणारा भारत आहे.या देशाचं नेतृत्व मोदीजींसारखे खरे राष्ट्रभक्त करत आहे.पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा हल्ला यशस्वी होऊ शकला नाही. भारताची संरक्षण प्रणाली इतकी मजबूत आहे की ती भेदण्याची क्षमता पाकिस्तानची नाही असे आमदार वानखेडे म्हणाले. ही तिरंगा बाईक यात्रा सैन्यदलाच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी आहे.असे प्रतिपादन आमदार सुमित वानखेडे यांनी तिरंगा बाईक रैली च्या समारोपीय सभेला संबोधीत करतांना लहानआर्वी येथे केले.साहूर येथुन स्वातंत्र्य लढ्यात शहीद झालेल्या आष्टी तालुक्यातील शहिदांच्या स्मरणार्थ व ऑपरेशन सिंदूर मधील सैनिकांच्या शौर्याच्या सन्मानार्थ आर्वी विधानसभेचे आमदार सुमित वानखेडे यांच्या नेतृत्वात व सुधीर दिवे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी रॅलीत भारत मातेचा रथ देखील विशेष आकर्षण ठरत होता.या भारत मातेच्या रथाचे धाडी,आष्टी, ममदापूर,तळेगाव,चिस्तुर,आनंदवाडी,भारसवाडा,खडकी,किन्हाळा व लहान आर्वी येथे ठिकठिकाणी जंगी स्वागत करीत पुजन करण्यात आले.यामुळे गावे भारत मातेच्या जयघोषाने दुमदुमली होती.यावेळी कार्यक्रमाला सुधीर दिवे देखील उपस्थित होते.दिवे म्हणाले,ऑपरेशन सिंदूर मध्ये स्वतःच्या जिवाची पर्वा न करता आपल्या शुरविर सैनिकांनी पाकिस्तानातील अतिरेक्यांना ठार केले.व पाकिस्तानलाच नव्हे जगाला भारताची ताकद काय आहे ते कळले.त्याच सैनिकांच्या सन्मानार्थ आपण ही तिरंगा बाईक रॅली काढली आहे.या देशावर आता वाकड्या नजरेने बघण्याची ताकद आता कोणात नाही.भारत हा मोदींजींच्या नेतृत्वातील बलशाली राष्ट्र आहे.याच सैनिकांच्या शौर्याच्या सन्मानार्थ हर घर तिरंगा मोहिमेंतर्गत आपल्या घरावर तिरंगा लावावा.असे सुधीर दिवे यांनी सांगीतले.यावेळी कार्यक्रमाला आमदार सुमित वानखेडे,सुधीर दिवे,भाजपा तालुकाध्यक्ष सचिन होले, वर्धा जिल्हा महामंत्री कमलाकर निंभोरकर,राजेश ठाकरे,रियाज खानसर,सुनिल साबळे,विशाल गाडगे,गजानन भोरे,गंगाधर मडावी,प्रशांत काकपुरे,श्रीराम ठोंबरे,आरती जाने, प्रमोद कापसे, दिलीप होले, साहेबराव देशमुख, जगदीश राठी, धीरज शेटे, तेजराज निंभोरकर, किशोर होले, काशिनाथ देशमुख इ. सह मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन देवानंद डोळस,प्रास्ताविक कमलाकर निंभोरकर तर आभार ऍड. मनिष ठोंबरे यांनी मानले.
