
हवामान विभागालाही भरली धडकी; धोका वाढला…
तुम्ही अनेक चक्रीवादळं पाहिले असतील मात्र काही चक्रीवादळं अशी असतात जी हवामान विभागाला देखील धडकी भरवतात. आता असंच एक नवीन संकट निर्माण झालं आहे. जो आता हवामान विभागाच्या देखील चितेंचा विषय बनला आहे.
सुरुवातील या चक्रीवादळाचा वेग केवळ प्रति तास 75 किमी एवढा होता, मात्र त्यानंतर अचानक या चक्रीवादळानं वेग पकडला असून, गेल्या 24 तासांमध्ये या चक्रीवादळाचा वेग प्रति तास 75 किमी वरून थेट 260 प्रति तास किमीवर पोहचला आहे. हा धोक्याचा इशारा मानला जात आहे.
अटलांटिक महासागरात हे चक्रीवादळ निर्माण झालं आहे, या चक्रीवादळाची गती पाहून हवामान विभागाला देखील घाम फुटला आहे. अटलांटिक महासागरात तयार झालेले एरिन चक्रीवादळ गेल्या 24 तसांमध्ये प्रचंड वेगवान बनलं आहे. या चक्रीवादळाचा वेग गेल्या 24 तासांमध्ये प्रति तास 75 किमीवरून थेट 260 प्रति तास किमीवर पोहोचला आहे, यामुळे हवामान तज्ज्ञांना देखील आश्चर्याचा धक्का बसला आहे. अवघ्या 24 तासांमध्ये हे वादळ लेव्हल एक वरून लेव्हल पाचवर पोहोचलं आहे.
शुक्रवारी सकाळी या वाऱ्याचा वेग प्रति तास 75 किमी एवढा होता. त्यानंतर शनिवारी या वाऱ्यानं रौद्र रूप धारण केलं, वाऱ्याचा वेग 75 वरून 160 प्रति तास किमीवर पोहोचला, त्यानंतर त्यांच्या पुढच्या अवघ्या 24 तासांमध्ये या वाऱ्याचा वेग हा ताशी 260 प्रति तास किमीवर पोहोचला आहे. हवामान शास्त्रज्ञाच्या मते या चक्रीवादळानं ज्या पद्धतीनं वेग पकडला आहे, ते पाहाता हा एक नवा उच्चांक असून, यांची नोंद रेकॉर्ड बुकमध्ये होण्याची शक्यता आहे. वातावरणात होणारे बदल आणि झपाट्यानं वाढत असलेलं समुद्राचं तापमान यामुळे वारंवार या प्रकारची चक्रीवादळं निर्माण होत असल्याची माहिती तज्ज्ञांकडून देण्यात आली आहे, अशा प्रकारची चक्रीवादळं ही सामन्यता ऑक्टबर, नोव्हेंबर महिन्यात पाहायला मिळतात, मात्र हे चक्रीवादळ ऑगस्ट महिन्यातच निर्माण झालं आहे, याला देखील समुद्राचं वाढत असलेलं तापमान जबाबदार असल्याचं हवामान तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
पूर आणि अतिमुसळधार पावसाचा धोका
दरम्यान हे वादळ प्रचंड वेगवानं असलं तरी या चक्रीवादळामुळे फार काही नुकसान होणार नाही, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. हे चक्रीवादळ अमेरिकेची पूर्व किनारपट्टी आणि बरमूडा यांच्यादरम्यान असलेल्या अटलांटिक समुद्रात निघून जाईल असा अंदाज आहे. मात्र या चक्रीवादळामुळे या प्रदेशात महापूर आणि अतिमुसळधार पावसाचा धोका निर्माण झाला आहे