प्रतिनिधी गडचिरोली -विजय शेडमाके.
गडचिरोली.
(एटापल्ली):-तालुक्यातील गुरुपल्ली येथील जय सेवा क्रीडा मंडल यांच्या वतीने गावातील युवकांना क्रीडाक्षेत्रात प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने भव्य कबड्डी व व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.
उद्घाटनप्रसंगी संबोधित करताना राजे अम्ब्रीशराव महाराज म्हणाले की,ग्रामीण भागातील युवकांमध्ये नैसर्गिक क्रीडागुण दडलेले आहेत.योग्य मार्गदर्शन,सातत्यपूर्ण सराव व अशा स्पर्धांची संधी मिळाल्यास या परिसरातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निश्चितच घडू शकतील असे मत त्यांनी व्यक्त केले.
पुढे बोलतांना ते म्हणाले या खेळामुळे युवकांमध्ये शिस्त,संघभावना व आत्मविश्वास निर्माण होतो आणि त्यातूनच आपल्या परिसराचे नाव राज्य,देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल होईल.
या स्पर्धेत विविध गावांतील कबड्डी व व्हॉलीबॉल संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.दोन्ही खेळांमध्ये अत्यंत चुरशीच्या व रोमांचक लढती पाहायला मिळाल्या. खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.
तसेच यावेळी राजे साहेबांच्या हस्ते गरीब कुटुंबाला पाण्याची कॅन व जग वाटप करण्यात आले.!
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम,साईनाथ गावडे,महादेव गावडे सौ.सविता गावडे सरपंच तुमरगुंडा,रंजना गावडे ग्रा सदस्य,भाजप तालुका अध्यक्ष प्रसाद पुल्लूरवार,भाजप महामंत्री प्रशांत आत्राम,भाजप जिल्हा सचिव मोहन नामेवार,ज्येष्ठ नागरिक देवूजी मट्टामी,रैजू गावडे,टिल्लूजी मट्टामी,डोलूजी दुर्वा आदी मान्यवर उपस्थित होते..
