चिपळूण प्रतिनिधी स्वाती हडकर
चिपळूण नगरपालिकेच्या सहा विषय समित्यांची निवड मंगळवार, दि. २० जानेवारी रोजी पार पडली. नगराध्यक्ष सकपाल अध्यक्ष असलेल्या स्थायी समितीवर सदस्यपदी विकी नरळकर, अंकुश आवले व शशिकांत मोढी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व सभापती हे स्थायी समितीचे सदस्य असतात.
या निवड प्रक्रियेत उपनगराध्यक्ष रूपाली दांडकर यांची नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी निवड करण्यात आली आहे. तर पाणीपुरवठा समितीच्या सभापतीपदी निहार कोवळे, बांधकाम समितीच्या सभापतीपदी कपिल शिर्के, आरोग्य समितीच्या सभापतीपदी शुभम पिसे, शिक्षण व क्रीडा समितीच्या सभापतीपदी हर्षली पवार, तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी रसिका देवळेकर यांची निवड झाली आहे.
या समित्यांच्या निवडीमुळे चिपळूण नगरपालिकेतील प्रशासकीय कामकाजाला गती मिळणार असून शहरातील विकासकामांना चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
