दै. चालु वार्ता भोकर प्रतिनिधी-विजयकुमार चिंतावार
भोकर / नांदेड – विराट विश्वकर्मा प्रभू जयंतीनिमित्त भोकर येथील विश्वकर्मा मंदिराच्या पाचव्या कलशारोहणा वर्धापन दिनानिमित्त दि. २४ ते ३१ जानेवारी २०२६ दरम्यान श्री शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले असून कथा प्रवक्ते प.पू. बालयोगी आचार्य स्वामी सारंग चैतन्यजी महाराज अमरावती हे राहणार आहेत.
भोकर शहरातील म्हैसा रोडवर असलेल्या श्री विराट विश्वकर्मा प्रभू मंदिर कलशारोहणाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त श्री शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले असून दैनंदिन कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत सकाळी ४ ते ६ काकडा ७ ते ९ शिवपुराण कथेचे पारायण दुपारी १ ते ४ शिवमहापुराण कथा ५ ते ६ हरिपाठ ७ ते ८ सामुदायिक प्रार्थना ८ ते १०:३० हरीकीर्तन व नंतर जागर भजन होईल २४ जानेवारी २०२६ रोजी ह.भ. प. गोविंद महाराज नांदेडकर यांचे कीर्तन रात्री ८ ते १०, २५ जानेवारी रोजी ह. भ. प. दिगंबर महाराज अंबड यांचे कीर्तन, २६ जानेवारी रोजी ह. भ. प. महंत प्रभाकर बाबा कपाटे श्रीकृष्ण मंदिर भोकर यांचे कीर्तन, २७ जानेवारी रोजी ह.भ.प. श्यामसुंदर महाराज गिरी बेंद्री आश्रम यांचे कीर्तन, २८ जानेवारी रोजी ह. भ. प. तुकाराम महाराज नांदेडकर यांचे कीर्तन, २९ जानेवारी रोजी ह.भ.प. कु. ज्ञानेश्वरी माई पांचाळ आळंदी यांचे कीर्तन, ३० जानेवारी रोजी ह. भ. प. अनंत महाराज बेटकर पूर्णा जि. परभणी यांचे कीर्तन ३१ जानेवारी सकाळी ९ ते १२ या वेळामध्ये काल्याचे किर्तन ह. भ. प. प. पु. बालयोगी आचार्य स्वामी सारंग चैतन्य जी महाराज यांचे काल्याचे किर्तन दुपारी १२ वाजता विश्वकर्मा जयंती उत्सव साजरा होईल व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल भजनी मंडळ काकीलवाड गुरुजी वारकरी शिक्षण संस्था भोकर हे असून परिसरातील भाविक भक्तांनी या कथेचा लाभ घ्यावा.
