डोणगांव – प्रतिनिधी सालार बेग
अवघ्या कमी वेळेत शैक्षणिक क्षेत्रात नावलैकीकास आलेल्या साथी बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित स्व.धर्मवीर दिलीपराव राहाटे आदर्श विद्या मंदिर डोणगांव च्या वार्षिक स्नेहसंमेलन मध्ये स्नेहसंमेलन यांच्या माध्यमातून मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो असे मत सत्कार मूर्ती मेहकर नगराध्यक्ष किशोर गारोळे यांनी व्यक्त केले.
दि 23 जानेवारी रोजी आदर्श विद्या मंदिराच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजीवनी परिवाराचे अनिलआप्पा आवटी तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष किशोर गारोळे, नगरसेविका सौ रुपालीताई गारोळे, ठाणेदार अमरनाथ नागरे,उबाठा शिवसेना तालूका प्रमुख निंबाजी पांडव, भाजपा महिला आघाडीच्या सौ ज्योतीताई बुरखंडे, सर्कल प्रमुख दिपक गायकवाड, पत्रकार हमीद मुल्लाजी सह संस्थाध्यक्ष सौ मिनाताई आढाव, सचीव गजानन आढाव आदि मान्यवर .उपस्थित होते. सर्वप्रथम दिपप्रज्वलन, सरस्वती पुजन, स्व.दिलीपराव राहाटे यांच्या प्रतिमेचे पूजन करुन आयोजकांनी मान्यवंर मंडळीचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ फेटे बांधून भव्य दिव्य सत्कार केला. प्रास्ताविक मनोगतातून सौ मिना आढाव यांनी संस्थेच्या प्रगतीचा व भविष्यातील उपक्रमाची विस्तृत माहिती यावेळी दिली.
यावेळी मेहकर नगरीच्या न.प निवडणुकीत सुयश प्राप्त करून नगराध्यक्ष व नगरसेविका पदि निवड झाल्याबद्दल किशोर गारोळे व सौ रुपालीताई यांचा भव्य सत्कार करण्यात आला. शालेय विद्यार्थी यांनी यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. ठाणेदार अमरनाथ नागरे, पत्रकार हमीद मुल्लाजी सह सत्कार मुर्ती गारोळे दाम्पत्यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन करुन आपल्या सत्काराला उत्तर दिली.
या कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलन मुख्याध्यापिका सौ प्रियांका मोरे तर आभार प्रदर्शन सौ सिमा मापारी ,सौ पुजा बोरकर सौ अल्हाट मॅडम यांनी केले, यशस्वितेसाठी सर्व शिक्षिके तर कर्मचारी वृंदानी अथक परिश्रम घेतले.
