पुणे प्रतिनिधी : पुष्पराज भोसले
लोहगाव : पुणे महानगरपालिका च्या प्रभाग क्रमांक ३ मधून नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या चार ही नगरसेवकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे आयोजन प्रवीण खांदवे मित्र परिवार व आझाद तरुण मंडळ तसेच लोहगाव मधील ग्रामस्थ च्या वतीने करण्यात आले होते. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक अनिल सातव , रामदास दाभाडे, ऐश्वर्या पठारे , श्रेयस खांदवे उपस्थित होते . हा सत्कार समारंभ वाघोली रोड येथील जायका हॉटेल मध्ये पार पडला . या कार्यक्रमाला परिसरातील तरुण वर्ग , महिला ,कार्यकते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना अनिल सातव यांनी निवडणूक मध्ये मिळालेले यश हे सर्व लोहगावकराचे आहे.
व त्या बद्दल मी सर्वांचे आभार मानतो.प्रभागाचा विकास करताना लोहगावच्या विकासाला प्राधान्य दिले जाईल. लोहगावातील आम्हाला शक्य होतील तेवढी विकास कामे आमच्या मध्यामा तून करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
तर निवडणुकी च्या प्रचारात आम्ही कुणावर ही टीका केली नाही. आम्हाला टीकेचे नाही तर विकासाचे राजकारण करायचे आहे.नक्कीच आम्ही प्रभागाचा विकास करू असे मत रामदास दाभाडे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन सोमनाथ खांदवे आणि आदित्य खांदवे यांनी केले.
