अमरावती (प्रतिनिधी)- संजय सरवटकर
अमरावती (प्रतिनिधी)-
स्थानिक प्रभात एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कार्यरत सनलाईट प्रायमरी इंग्लिश स्कूल व सनशाइन प्रायमरी इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रजासत्ताक दिन उत्सव व वार्षिक स्नेहसंमेलन ‘उमंग २०२६’ अंतर्गत बक्षीस वितरण समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.
सनशाइन प्रायमरी इंग्लिश स्कूलच्या मैदानावर आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभात एज्युकेशन सोसायटीचे वि. दा. पवार, प्रमुख अतिथी म्हणून माजी लष्करी अधिकारी कर्नल लक्ष्मणराव गाले, आंतरराष्ट्रीय माउथ ऑर्गन वादक देवेंद्र गणोरकर, आकाशवाणी अमरावतीचे कार्यक्रम अधिकारी आशिष गावंडे, प्रभात एज्युकेशन सोसायटीच्या सचिव कविता पवार उपस्थित होते.
प्रारंभी वि. दा. पवार व कर्नल लक्ष्मणराव गाले यांचं हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तदनंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य, समूहगीत, नाट्यप्रयोग व कवितावाचने सादर केले व उपस्थितांची मने जिंकली. देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक जाणीव यांचे प्रभावी दर्शन घडविणाऱ्या या सादरीकरणांचे प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक करण्यात आले.
त्यानंतर वार्षिक कार्यक्रम ‘उमंग २०२६’ अंतर्गत वर्षभरातील शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक व सहशालेय उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान व बक्षीस वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचे कौतुक करताना मान्यवरांनी त्यांना भविष्यातही सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करण्याचे आवाहन केले.
यावेळी कर्नल लक्ष्मणराव गाले यांनी विद्यार्थ्यांना देशभक्ती, शिस्त, मेहनत व आत्मविश्वासाचे महत्त्व सांगत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तर देवेंद्र गणोरकर यांनी कष्ट, चिकाटी व सातत्य या गुणांमुळेच यश प्राप्त होते, असे नमूद केले. आशिष गावंडे यांनी शाळेद्वारे घेतल्या जाणरे उपक्रम हे राष्ट्र उभारणीसाठी महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित केले. तर अध्यक्षीय भाषणात वि. दा. पवार यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था सदैव कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केले. या कार्यक्रमास पालक, शिक्षक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थिती होते. विद्यार्थ्यांच्या कामगिरीबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे नियोजन, शिस्तबद्ध आयोजन व उत्कृष्ट व्यवस्थापन याबद्दल संस्थेचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, आत्मविश्वास व प्रेरणा निर्माण केल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. कार्याक्रमचे प्रास्ताविक मुख्याध्यापक एलकेवी पवार यांनी केले. सूत्रसंचालन माधुरी नेरकर यांनी केले तर आभार उषा जैन यांनी मानले. कार्यक्रमाचा समारोप खाऊ वाटप व आभार प्रदर्शनाने करण्यात आला.
