ठाणे-प्रतिनिधी-नागेश पवार – २७ जानेवारी २०२६ धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या ७५ व्या जयंती निमित्त ७५ महिलांनी आपल्या ७५ गुलाबी ई-रिक्षाने लहान मुलांपासून ७५ वर्षावरील नागरिकांना मोफत प्रवास सेवा देऊन जयंती सामाजिक उपक्रमाने साजरी केली. 
सकाळी १० वाजता ७५ महिला गुलाबी युनिफॉर्म घालून ७५ गुलाबी ई-रिक्षा सोबत शासकीय विश्रामगृह, कोर्ट नाका, ठाणे येथे उपस्थित होत्या. मिलींद बल्लाळ, राजन साप्ते आदी मान्यवरांच्या हस्ते भगवा झेंडा फडकवून मोफत सेवेचे उदघाट्न करण्यात आले.
वाट न बघता आज रिक्षा मिळली, आज कोणी रिक्षाने नाही म्हटले नाही, प्रवास सुखकर झाला, अशा प्रतिक्रिया ठाणेकर नागरिकांनी दिल्या.
धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या समाजसेवेच्या दृष्टीकोनाला आणि कार्याला दिलेली ही आदरांजली आहे, असे आयोजक जयदीप कोर्डे, डॉ. श्रीकांत राजे, संजय मिरगुडे, अविनाश पावळे यांनी म्हटले.
