म्हसळा प्रतिनिधी -अंगद कांबळे
म्हसळा तालुक्यातील नेवरूळ यां गावी रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा नेवरूळ येथे ७७ वा प्रजासत्ताक दिनी शाळेचे मुख्याध्यापक श्री विजय महाजन सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तसेच न्यू इंग्लिश स्कूल नेवरूळ येथे मुख्याध्यापक श्री उमेश मिनेकर सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यां वेळी शाळेचे शिक्षक,विध्यार्थी, पालक मोठयासंख्येने उपस्थित होते
तसेच नेवरूळ ग्रामपंचायत येथे गावचे प्रथम नागरिक नेवरूळ ग्रामपंचायत सरपंच सौ श्वेता विनोद लटके ह्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले
आणि विशेष आनंदाची बाब म्हणजे आज प्रजासत्ताक दिनी गावात प्रभातफेरी मध्ये खरसई कोळीवाडा चे खालुबाजा वाद्य ह्यांनी स्वखुशीने सहभाग घेऊन प्रभातफेरीची शोभा वाढवली गावात प्रथमच प्रजासत्ताक दिनी खालुबाजा वाद्य वाजल्याने गावातील समस्थ ग्रामस्थांना आनंद व्यक्त केला, व रा. जि प शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आणि सगळ्यांनी कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रम उत्साहात पार पाडला या वेळी ग्रा. सदस्य अशोक लाड, सौ स्वरा महागावकर गाव अध्यक्ष नामदेब महाडिक, विनोद लटके, रामचंद्र लटके,सचिम काते,अल्केश लाड, पोलीस पाटील निलेश लटके, शंकर काते, शांताराम बिरवाडकर, राजू बिरवाडकर, महेंद्र लटके,महिला अध्यक्ष सौ बायोबाई काते,रागिणी लटके, समीक्षा काते, सुलोचना रिकामे,निलाक्षी रिकामे इ. ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते
