दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी संतोष मंनधरणे
देगलूर शहर व परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या “श्रीनिवास ब्लड सेंटर, देगलूर तुकाराम नगरीत, कॉप्लेक्स, या ठिकाणी अद्ययावत रक्तपेढीचे भव्य उद्घाटन बुधवार, दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता आयोजित करण्यात आले आहे. या रक्तपेढीचे उद्घाटन आई-वडिलांच्या शुभहस्ते सुनिता माधवराव बिरादार . तारा काशिनाथ हुलगे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणूनमा. आ.
जितेश रावसाहेब अंतापुरकर (आमदार देगलूर-बिलोली विधानसभा), विजयमाला बालाजी टेकाळे (नगराध्यक्षा, देगलूर नगरपरिषद), अड. अंकुश देसाई देगावकर (उपनगराध्यक्ष, नगरपरिषद देगलूर), अनुप पाटील (SDM, देगलूर), संकेत गोसावी (DYSP, देगलूर), भरत सूर्यवंशी (तहसीलदार, देगलूर), नीलम कांबळे (मुख्याधिकारी, नगरपरिषद देगलूर), मारोती मुंडे (पोलीस निरीक्षक, देगलूर) यांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर म्हणून डॉ. जी. ए. गायकवाड, डॉ. नरेश देवणकर, डॉ. एस. जी. आलूरकर, डॉ. एस. एम. एकलारे, डॉ. जनार्दन ई. भूमे, डॉ. विनायक मुंडे, डॉ. शेख रफीकयोद्दीन डॉ. सदावर्ते डॉ. एम. बी. देगलूरकर, शडॉ. इंगोले एस.वी. तम्मेवार यांची उपस्थिती लाभणार आहे. या रक्तपेढीच्या माध्यमातून देगलूर व परिसरातील नागरिकांना २४ तास सुरक्षित रक्तपुरवठा, अत्याधुनिक रक्ततपासणी सुविधा, तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने रक्त उपलब्ध होणार आहे. अपघातग्रस्त रुग्ण, गरोदर माता व शस्त्रक्रियेसाठी आवश्यक रक्ताची गरज लक्षात घेऊन ही सेवा सुरू करण्यात येत आहे. या उद्घाटन सोहळ्यास डॉ. प्रणीता काशिनाथ हुलगे (बिरादार) (MBBS GMC Aurangabad, MD Pathology Sion Hospital Mumbai) यांचे विशेष उपस्थिती व मार्गदर्शन लाभणार आहे. या कार्यक्रमासाठी सुरेश दत्तात्रय देशमुख आहे. (कोडचिरकर), मदन पुरुषोत्तम कळसे, वंदना गोविंदराव
मानसपुरे, शरदचंद्र सहदेवराव खानापुरे, कोमल सुरेशराव वाघमारे यांनी उपस्थित राहणार आहेत. रक्तदान हे महादान असून एका रक्तदात्याच्या रक्तामुळे गरजू रुग्णांचे प्राण वाचू शकतात. अपघात, प्रसूती, मोठ्या शस्त्रक्रिया, थैलेसेमिया व कॅन्सरसारख्या आजारांमध्ये रक्ताची नितांत गरज असते. अनेक वेळा वेळेवर रक्त उपलब्ध न झाल्यामुळे रुग्णांचे जीव धोक्यात येतात. ही गंभीर बाब लक्षात घेऊन देगलूर शहरात श्रीनिवास ब्लड सेंटर सुरू करण्यात येत आहे.या रक्तपेढीमुळे देगलूर व परिसरातील नागरिकांना आता रक्तासाठी नांदेड किंवा इतर शहरांवर अवलंबून राहावे लागणार नाही. २४ तास सुरक्षित व तपासलेले रक्त, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित रक्तसाठा, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने रक्त उपलब्ध होणे, ही या सेंटरची मोठी वैशिष्ट्ये आहेत. तसेच रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांसाठी योग्य वैद्यकीय तपासणी, सुरक्षित प्रक्रिया व आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. श्रीनिवास ब्लड सेंटरमुळे सामाजिक बांधिलकी जपत देगलूर शहर आरोग्यसेवेत अधिक सक्षम होणार असून गरजू रुग्णांना जीवनदान मिळणार आहे. त्यामुळे तरुणांनी, सामाजिक संस्था व नागरिकांनी पुढे येऊन स्वेच्छेने रक्तदान करून या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या लोकोपयोगी उपक्रमास शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले
