ठाणे- प्रतिनिधी- नागेश पवार
मुंब्रा (ठाणे)- दि. २२/०१/२०२६ रोजी सायंकाळी ०६.०० वा. चे सुमारास डीसीबी बँकेच्या सामेरील खाडीमशिनकडे जाणा-या रस्त्यावर, मुंब्रा, ठाणे येथे फिर्यादी नामे फरजाना मोहम्मद फिरोज मन्युरी, वय २३ वर्षे, रा. ठि. रूम नं ७०२, अजमेरी हाईटस, खडीमशीन रोड, सेंटमेरी स्कुल, ७ वा माळा, कौसा, मुंब्रा, ठाणे हया त्यांच्या दोन्ही मुलींना कडीवर घेवुन रस्ता क्रॉस करत असताना मोठी मुलगी अनाबिया ही रडत होती. फि’ ची मुलगी आफीया खातुन शाहरूख अली, वय ३ महीने (जन्म दिनांक १८/१०/२०२५) हीरा अनोळखी महीलेने फि’ जवळ आली व फि’ स बोलली कि “छोटी बच्ची को मेरे गोद मे देदो मैं भी सामने हि जा रही हु” त्यावेळी फि’ ने छोटी मुलगी आफीया हिस तिच्याकडे दिले असता नमुद आरोपी महिलेने फि’ ची मुलगी हिला कायदेशीर रखवालीतुन घेवुन पळून नेवुन अपनयन केले म्हणुन मुंब्रा पोलीस स्टेशन गुन्हा रजि. क्र. ८९/२०२६ बी एन एस १३७ (२) प्रमाणे दिनांक २२-०१-२०२६ रोजी दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यातील अपहरित मुलगी नामे आफिया वय-०३ महिने हिचा शोध घेणे करिता तात्काळ ४ तपास पथके तयार करून तपास चालू करण्यात आला. अपहरीत लहान मुलीचा शोध घेताना घटनास्थळ डीसीबी बँकेच्या समोरील रोडवरील सीसीटीव्ही फुटेज वरून अपहरण करणारी एक बुरखाधारी महिला असल्याचे निष्पन्न झाले. सदर महिला ही रिक्षामध्ये बसून मुंब्रा स्टेशन पर्यत आलेली दिसत होती. त्यानंतर सदर महिलेच्या सारखी दिसणारी व बुरख्याच्या आत तिच्या हातातअसलेल्या बाळाच्या पायातील सॉक्स एक दिड इंच बाहेर आलेला होत्या त्या आधारे महिलेचा शोध घेत असताना मुंब्रा ते वांगणी येथील प्रत्येक रेल्वे स्टेशन व आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सदर महिला ही कोणत्याही रेल्वे स्टेशन वर उतरलेली दिसून येत नव्हती. सदर तपासामध्ये कोणता तरी तपासाचा धागा आपल्या हातून सुटत असल्याचे वाटत असल्याने गुन्हे शोध पथकाचे स. पो.नि सावंत व टिम यांना आदेशीत करून घटनास्थळापासून पुन्हा सीसीटीव्ही च्या आधारे तपास सुरू केला असता मुंब्रा रेल्वे स्टेशन येथील कॅमेरे बारकाईने तपासले असता एक बुरखाधारी संशयित महिला ही गडबडीने लहान मुलाला घेऊन प्लॅटफॉर्म क्र. ०२ वर उतरताना व त्या महिलेची वाट पाहत असलेला एक इसम दिसून आला. त्या महिला व पुरुषासोबत आणखी एक महिला दिसत असून ती मुंब्रा रेल्वे स्टेशन बाहेर गेली असल्याचे दिसून आले. त्या संशयित महिला व अनोळखी इसमाचा शोध चालू केला असता ते दोघे त्या लहान बाळाला घेऊन सी.एस.एम. टी. लोकल मध्ये बसून गेले असल्याचे दिसून आले. त्या आधारे ठाणे रेल्वे स्टेशन, नाहूर भांडुप, घाटकोपर, विद्या विहार, कुर्ला रेल्वे स्टेशन येथील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता सदर महिला व पुरुष ठाणे स्टेशन येथे लोकल मधून उतरले असल्याचे व तपासाची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने त्या बाळाला लपेटलेला कपडा हा बदललेला व त्या महिलेने आपले तोंडावरील नकाब बदलले असल्याचे दिसून आले. त्यानंतर सदर महिला व पुरुष हे प्लॅटफॉर्मवर दिसून आले नाहीत त्यामुळे आम्ही ठाणे रेल्वे स्टेशन वरील सर्व ठिकाणचे एन्ट्री व एक्झिट पॉईंटचे कॅमेरे चेक केले असता सदर महिला व पुरुष दिसून आले नाहीत. त्यामुळे तपासाला पुढे दिशा मिळणे बंद झाले. त्यानंतर त्या महिला व पुरुषासोबत असलेली आणखी एक बुरखादारी महिला हिचा शोध सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे घेतला असता ती मुंब्रा रेल्वे स्टेशन वरून एका रिक्षात बसलेली दिसून आली परंतु रिक्षाचा क्रमांक दिसून येत नसल्याने आम्ही आमचे गुप्त बातमीदारामार्फत सदर रिक्षा शोधून काढली. परंतु त्या रिक्षा चालकाने कोणतीही उपयुक्त अशी माहिती मिळुन आली नाही. त्यामुळे पुन्हा सीसीटीव्ही कॅमेरे व्दारे तपास करत गेलो असता सदरची महिला ही शादी महल हॉल रोड, इन्शानगर येथे आली असल्याचे दिसून आले. परंतु सदर ठिकाणी खूप बिल्डिंग असल्याने ती कोणत्या बिल्डिंग मध्ये गेली याबाबत काही एक माहिती नव्हती. परंतु स पो नि सावंत व तपास पथकातील कर्मचारी यांचे कौशल्यपूर्ण तपास व तांत्रिक तपास तसेच गुप्त बातमीदार यांच्या मदतीने त्या महिलेस तिचे घरातून तपासकामी ताब्यात घेतले. त्या महिलेचे नाव नसरीन इकलाख शेख असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर तिच्याकडे तपास केला असता तिने सदरचे बाळ हे अकोला जिल्ह्यातील खेटरी ता. पातुर येथे असल्याचे सांगितले. त्यानंतर लागलीच तपासात खेटरी गाव, जिल्हा अकोला येथे येऊन लहान बाळ व आरोपीत मोहम्मद मुजीब गुलाब वय -३१ वर्ष, रा. – हाजी नगर खेटरी गाव व त्याची पत्नी खैरूणिसा मुजीब मोहम्मद, वय ३० वर्ष, रा. सदर यांना ताब्यात घेण्यात आले असून अपहरण झालेली मुलगी आफिया ही सुखरूप असून तिला देखील ताब्यात घेण्यात आलेली आहे.
तरी सदर तपासामध्ये मुंब्रा ते सीएसएमटी, मुंबई व मुंब्रा ते टिटवाळा, वांगणी दरम्यानचे सुमारे १६०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून, गुप्त बातमीदार मार्फत तसेच तांत्रिक तपास करुन सहा दिवस तररोज १६ ते १८ तास अहोरात्र तपास करून सदर गुन्हा उघडकीस आणलेला आहे.
नमुद गंभीर गुन्हा उघडकीस आणण्याची उल्लेखनीय कामगिरी श्री.अशुतोष डुंबरे, मा. पोलीस आयुक्त, ठाणे शहर. श्री. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस सह आयुक्त, ठाणे शहर. श्री. विनायक देशमुख, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, ठाणे शहर, श्री. सुभाषचंद्र बुरसे, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-१, श्रीमती प्रिया डमाळे. सहाय्यक पोलीस आयुक्त कळवा विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक श्री. नितीन पगार, पोलीस निरीक्षक शरद कुंभार, सपोनि तेजस सावंत, सपोनि/विनायक माने, पोउपनिरी/रविंद्र पाखरे, पोउपनिरी/सुरज पाटील, पोहवा /१५०७ सतिश खाबडे, पोहवा/७३५ संदीप थारोत, पोहवा/५३०२ अंकुश शिंदे, पोहवा /१९८९अजिज तडवी, पोहवा/४२६ कांबळे, पोहवा/६५५६ वसावे, पोहवा/६९३३ गायकवाड, पोशि/८३७९ कृष्णा आव्हाड, पोशि/८०९१ मच्छिद्र विरकर, पोशि/ १४७५ अजिंक्य महाडीक, पोशि/२७५८ नितीन पाटोळे, पोशि/७६४१ एडके, पोशि/४०१२ सुर्यवंशी, पोशि/२७४० वारकड, पोशि/३३९१ हरगुले, पोशि/२०३४ सपकाळे, पोशि/१३९३ आव्हाड, मपोशि/२१७८ दुर्वा देसाई यांनी केलेली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक पाखरे हे करीत आहेत.

