इराण आणि इस्राइल-अमेरिका यांच्यातील युद्ध दिवसेंदिवस आणखीनच तीव्र होत चालले आहे. एकीकडे शांततेच्या चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे हल्ले देखील सुरूच आहेत. अमेरिकन माध्यमांनी जारी केलेल्या माहितीनुसार, इराणने कुवेतच्या अली अल सलेम एअरबेसवर ड्रोन हल्ला केला असून, या हल्ल्यात जवळपास १५ लोक गंभीर जखमी झाले आहेत.
या दरम्यान, सौदी अरेबियाने त्यांच्या पूर्व भागात आलेल्या ७ बॅलेस्टिक मिसाईल हवेतच रोखून नष्ट केल्या. या मिसाईलचा मलबा सौदीच्या वीज प्रकल्पाजवळ पडला आहे.
आपल्यावर होणाऱ्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराण आता आखाती देशांमधील अमेरिकेच्या तळांवर हल्ले चढवत आहे. अमेरिकन मंत्री पीट हेगसेथ यांनी मंगळवारी माहिती देताने म्हटले की, आज इराणवर मोठे हल्ले केले गेले आहेत. त्यामुळे इराणने केलेला हल्ला हा अमेरिकेला दिलेले प्रत्युत्तर मानले जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर मोठा हल्ला करण्याची धमकी दिल्यानंतर लगेचच इराणने हे हल्ले केले आहेत.
सौदीवरील हल्ल्यामुळे झाले मोठे नुकसान
सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सौदीने मंगळवारी त्यांच्या पूर्व क्षेत्रात आलेल्या सात बॅलेस्टिक मिसाईल हवेतच नष्ट केल्या. या मिसाईल्सचा कचरा अजूनही त्याच्या वीज प्रकल्पाजवळ पडला आहे. नेमके किती नुकसान झाले आहे, याची तपासणी करण्याचे काम अद्याप सुरू असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. प्राथमिक आकडा ७ सांगितला जात असला, तरी नेमक्या किती मिसाईल यावेळी नष्ट करण्यात आल्या याचा स्पष्ट आकडा समोर आलेला नाही.
कुवेतवर झालेल्या हल्ल्यात १५ सैनिक जखमी
दोन अमेरिकी अधिकाऱ्यांचा हवाला देत अमेरिकी माध्यमांनी वृत्त दिले आहे की, काल रात्री कुवेतच्या अली अल सालेम हवाई तळावर झालेल्या इराणी ड्रोन हल्ल्यात किमान १५ अमेरिकी नागरिक जखमी झाले. इराणने या प्रदेशातील अमेरिकी तळांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. इराणने मंगळवारी केवळ या प्रदेशातील अमेरिकी तळांवरच हल्ला केला नाही, तर इस्रायलवर अनेक क्षेपणास्त्रेही डागली.
