दैनिक चालु वार्ता भंडारा प्रतिनिधी- प्रतिनिधी-राजेश गेडाम
भंडारा जिल्हा पोलीस दलातुन विदेश मंत्रालय दिल्ली येथे निवड
भंडारा-: सन 2010 रोजी स्नेहल गजभिये हे भंडारा जिल्हा पोलीस प्रशासनात भरती झाले. संगणकीय व इतर तांत्रीक ज्ञानाच्या अनुभवाने त्यांची क्राईम ब्रांच तसेच सायबर क्राईम सेल येथे विविध गोपनीय कामकाजाकरीता नियुक्त करण्यात आले- क्राईम ब्राॅच येथे नियुक्तीस असतांना दिवस रात्र कामकाज करून खुन, दरोडे, जबरी चोरी यासारख्या गंभीर गुन्हयांचा छडा लावण्यात यांनी मोलाची भुमीका बजावलेली आहे. या प्रशंसनीय कामकाजाकरीता त्यांना सन 2019 रोजी मा. पोलीस महासंचालक मुंबई यांचेकडुन उत्कृष्ट अन्वेषण व अपराधसिध्दी या पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. त्यांच्या तांत्रीक ज्ञानाच्या अनुभवाने त्यांचेकडे सायबर सेलची जबाबदारी दिली होती. सायबर सेल येथे कार्यरत असतांना विविध तांत्रीक गुन्हे व तपास, सायबर जनजागृती, सायबर गुन्हे प्रतिबंध तसेच विविध तक्रारदारांचे फसवणुक झालेले लाखो रूपये वाचविण्यात यश संपादन केले आहे. पोलीस नाइक स्नेहल गजभिये यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरी, उत्तम सर्विस शीट तसेच नवी दिल्ली येथे दिलेल्या उत्तम मुलाखतीमुळे त्यांची विदेश मंत्रालयाने दखल घेत मिनीस्ट्री ऑफ एक्सटरनल अफेअर्स, दिल्ली येथे निवड केलेली आहे.
पोलीस नाईक स्नेहल गजभिये हे भंडारा जिल्हा पोलीस दलातुन विदेश मंत्रालय दिल्ली येथे निवड झालेले प्रथमच अंमलदार आहेत. मिनीस्ट्री ऑफ एक्सटरनल अफेअर्स, दिल्ली येथे काही महिने प्रशिक्षण घेवुन ते विदेशात सेवा देणार आहेत. या यषाकरीता पोलीस अधीक्षक श्री. वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक श्री. अनिकेत भारती, गुन्हे शाखा व सायबर सेलचे निरीक्षक जयवंत चव्हान, अभिजीत पाटील व सहकारी कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे
