दैनिक चालु वार्ता लोहा प्रतिनिधी -राम पाटील क्षीरसागर
लोहा तालुक्यातील सायाळ येशील युवा प्रगतशील शेतकरी रत्नाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खरीप हंगाम खूप जवळ आलेला आहे सर्व शेतकरी खरीप पेरणीपूर्व नियोजनाच्या तयारी मध्ये आहेत त्याच अनुषंगाने शेतकऱ्यांना पेरणीपूर्व मार्गदर्शन करून येणाऱ्या हंगामामध्ये चांगल्या पद्धतीने उत्पादनामध्ये भर पडावा या हेतूने सोयाबीन कापूस मूग उडीद हळद इत्यादी पिकांवर शेतकऱ्यांमध्ये चर्चा झाली शेतकऱ्यांनी बीबीएफ पद्धतीने सोयाबीनची पेरणी करावी उत्पादनामध्ये वीस ते पंचवीस टक्क्यांनी वाढ होते व अति पाऊस झाला तर बीबीएफ पद्धतीने पेरणी केल्यामुळे दांडाने पाणी वाहून जाते व पावसाचा खंड पडला तर पीक तक तक धरते शेतकऱ्यांनी सोयाबीन प्रति एकरी 25 किलो बियाणे उगवण क्षमता तपासून पेरावे व कापसाच्या झाडांची संख्या वाढवावी असे या चर्चासत्रामध्ये शेतकऱ्यांना सांगण्यात आले शेतकऱ्यांनी एकाच जमिनीवर वारंवार एकच पीक घेऊ नये पिक फेरपालट करावे अति खताचा वापर टाळावा यामुळे मानवाच्या आरोग्यात वर खूप मोठा दूषित परिणाम होत आहे त्यामुळे केमिकल चा वापर कमीत कमी करावा जमिनी मधील गांडूळे अति रसायनांच्या वापरामुळे नष्ट झाले आहे जमिनीचा कस दिवसेंदिवस खालावत
चालला आहे म्हणून शेतकऱ्यांनी शेतीमधील काडी कचरा आपल्या जमिनी मध्ये गाडावा त्यामुळे जमिनीमध्ये पाणी धरण्याची क्षमता वाढते सेंद्रिय कर्ब सुधारतो जमिनीमध्ये हवा खेळती राहते त्यामुळे पिकांना खूप मोठा फायदा होतो अशा विविध विषयावर शेतकर्यांमध्ये विचारांची देवाण-घेवाण सखोल चर्चा सत्र शेतकरी रत्नाकर पाटील ढगे यांनी उपस्थित शेतकऱ्यांबरोबर केले कार्यक्रमाला खूप मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते गंगाधर विश्वनाथ पवार जगनाथ नामदेव पवार राघोजी ढगे राजू ढगे रतन राठोड निवृत्ती ढगे गजानन मोरतळे गोविंद सिंग ठाकूर सूर्यकांत पवार बालाजी राठोड बालू सिंग ठाकूर बालासाहेब मोरताटे गंगाधर नारायण पवार गिरीधर पवार मारुती पवार आदी शेतकरी उपस्थित होते
