दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
नांदेड : – जळगाव येथील मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना तातडीने बडतर्फ करा अन्यथा आंदोलन करणार असा इशारा छावाचे जिल्हाध्यक्ष माऊली पाटील पवार सायाळकर यांनी दिला आहे .
पोलिस निरीक्षक बकाले यांच्यावर तात्पुरत्या स्वरूपाची केलेली कार्यवाही आम्हाला मान्य नसुन एलसीबी पोलिस विभागात निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या किरण बकाले या बेजबाबदार अधिकार्याने मराठा समाजाबद्दल अगदी खालची भाषा वापरून आक्षेपार्ह व द्वेषपूर्ण विधान केले आहे. सरकारी सेवेत असणारा एखाद्या पोलिस अधिकार्याने एखाद्या समाजाबद्दल अत्यंत चुकीचे, खालच्या पातळीचे द्वेषपूर्ण विधान करणे हे निषेधार्हच नसून तर त्या अधिकार्याला भररस्त्यात चोप देण्यासारखा गुन्हा आहे. अशा व्यक्तींमुळे समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकते म्हणून अशा समाजकंटकांना कडक शिक्षा झालीच पाहिजे. त्यामुळे अशा जातीय द्वेष पसरविणार्या पोलिस अधिकार्याला कायमस्वरूपी सेवेतून बडतर्फ करा कुठलाही हलगर्जीपणा प्रशासनाने करू नये यापुढे मराठा समाजाबद्दल अशा घटना घडल्यास समाज रस्त्यावर उतरून अशा समाजकंटकांना चोप दिल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देखील छावाचे जिल्हाध्यक्ष माऊली पाटील पवार यांनी दिला आहे .
सामाजिक तेढ निर्माण करणारे अधिकारी कलंक असुन राज्यात मराठा समाज सर्व जाती धर्माच्या समाज बांधवांना सोबत घेऊन जात असताना पोलीस विभागातील एका जबाबदार पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने समाजाविषयी असं संभाषण करणे म्हणजे पोलीस विभागाला कलंक असल्याचे मत छावाचे जिल्हाध्यक्ष माऊली पाटील पवार यांनी यावेळी व्यक्त केले बकाले यांना तात्काळ बडतर्फ करा अन्यथा आंदोलन करु असा इशारा यावेळी त्यांनी दिला.
