दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे
देगलूर(दि.17) रोजी परमपूजनीय गोळवलकर गुरुजी विद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी स्थानिक समन्वय समितीचे सदस्य भागवतजी तम्मेवार यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक समन्वय समितीचे सदस्य भागवतजी तम्मेवार हे होते. प्रमुख वक्ते योगेश वझलवार हे होते जेष्ठ शिक्षक वसंत वाघमारे व प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दमन देगावकर यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने झाली. या नंतर शाळेतील लिपिक गिरीश दीक्षित यांनी मराठवाडा गीताने सर्वांना मंत्रमुग्ध केले. तसेच प्राथमिक विद्यालयातील आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत बोलताना पांचाळ राधिका यांनी म्हटले की भारतातील ५६५ संस्थानिका पैकी ५६२ संस्थानिकांनी भारतात सामिल होण्यासाठी सहमती दर्शविली पण तीन संस्थानिकांनी सहमती दर्शवली नाही त्या पैकी जम्मू काश्मीर, जूनागड आणि हैदराबाद येथील निजामशाहीचे सरकार होते. शेवटी भारत सरकारला पोलिस कारवाई करून हा भाग निजामाच्या तावडीतून मुक्त करावा लागला. कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख वक्ते योगेश वझलवार यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाचा धगधगता इतिहास प्रभावी भाषेत सविस्तर मांडला. रजाकाराच्या विविध घटना व प्रसंगाविषयी माहिती सांगत मराठवाडा मुक्तीसाठी अनेक लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. या त्यांच्या कार्याला त्यांनी उजाळा दिला. या लढ्यात आर्यसमाजाचे योगदान खूप मोलाचे आहे.असे मत मनोगतात त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेष्ठ शिक्षक सुरेश कुलकर्णी तपोवनकर यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
