दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
दक्षिण मतदारसंघात आ मोहन आण्णा हंबर्डे यांनी प्रलंबित अनेक विकासकामे पूर्ण केली व सुनेगाव ते पेनुर रस्त्याचा आमचा हलाखीचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल मनःपूर्वक आभार
– माधव पा बुद्रुक ( उपसरपंच पांगरी )
नांदेड : – एकीकडे राज्यात सत्तापालट होऊनही सतत जनता जनार्दनाची कामे करण्यात मग्न असणारे नांदेड दक्षिण मतदारसंघाचे आमदार मोहन आण्णा हंबर्डे यांच्या विकास कामांची घौडदौड सतत मतदारसंघात पहावयास मिळत आहे . नांदेड दक्षिण मतदारसंघात सुनेगाव ते पेनुर रस्त्याचे १५. कोटी ७५ लाख रूपायांच्या विकास कामांचा शुभारंभ आ मोहन आण्णा हंबर्डे यांच्या हस्ते पार पडला. सुनेगाव – पेनुर मार्ग ग्रामीण वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. सदरील रस्त्यासाठी आ मोहन आण्णा हंबर्डे यांनी शासनस्तरावर पाठपुरावा करून काम त्वरित मंजूर करून घेतले मतदारसंघातील गेली कित्येक वर्षे प्रलंबित असलेली विकासकामे नागरी प्रश्न आ मोहन आण्णा हंबर्डे यांच्या कार्यकाळात मार्गी लागत असल्याचे चित्र मतदारसंघात दिसून येत आहे.
सुनेगाव – पेनुर येथील रस्त्याचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल पांगरी येथील गांवकरी मंडळींच्या वतीने आ मोहन आण्णा हंबर्डे यांचे यावेळी जल्लोषात स्वागत केले.
या विकासकामांच्या पार पडलेल्या शुभारंभ सोहळ्या प्रसंगी नांदेड दक्षिणचे आ मोहन आण्णा हंबर्डे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता मा.नाईक साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ.कालिदासराव मोरे, श्रीनिवासराव मोरे, माजी सभापती खुशाल पा पांगरीकर माजी सरपंच रामराव पा माजी चेअरमन विठ्ठलराव पा सरपंच भारत दादा कोपनर उपसरपंच माधव पा सरपंच आण्णासाहेब पवार मारोतराव पा ज्ञानोबा पा यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
