दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
विकासाची गंगा घरोघरी हा वसा घेतलेली ग्रामपंचायत बोरगाव आ. ता. लोहा. येथील शंभर (100) सदस्यांचा आदर्श गाव पाटोदा जिल्हा छ. संभाजीनगर पाहणी दौरा
बोरगाव आ. या गावांमध्ये कोणत्याही मूलभूत सुविधा नसल्याने गावातील नागरिकांनी सन 2020 – 2021 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधारी लोकांचा पराभव करून सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नासाठी सतत कार्य करणाऱ्या श्री. पुंडलिकराव हारजी पाटील यांच्या व त्यांच्या सोबतच्या सहकाऱ्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांचे पॅनलचे संपूर्ण नवीन सदस्य बहुमताने निवडून देऊन सत्ता परिवर्तन केले. त्यात महीला मागार्स्वीय सरपंच सौ. कांताबाई तुळशीराम हंकारे, उपसरपंच सौ. जयश्रीताई पुंडलिकराव पाटील व ग्रामपंचायत सदस्य सौ.सुशिलाबाई भीमराव पाटील, सौ. शांताबाई शेषराव पाटील, सौ. कांताबाई श्रीरंग गायकवाड, सौ. मिराबाई पांडुरंग गळेकाटू, सौ.सविता गोविंद सुरनर, श्री. कल्याण रावसाहेब पाटील, अल्लावदीन इब्राहिम शेख असे सदस्य निवडून दिले. नवीन सदस्यांनी निवडणूक झाल्याच्या नंतर एका वर्षाचे आत गावातील सर्वसामान्य व सर्व जाती-धर्मांच्या लोकांना एकत्र करून गावातील विकास कामे करण्यास सुरुवात केली त्यात खूप कष्टाने व मेहनतीने पाठपुरावा करून बोरगावचे इतिहासात पहिल्यांदाच 1. सुनेगाव ते बोरगाव अशी सार्वजनीक पिण्याचे पाणी पुरवठा योजना मंजूर करून त्या विहिरीचे काम पूर्ण केले आहे. 2. श्री. गुरुविरशाप्पा महाराज देवस्थान मंदिराचे सभामंडपाचे नवीन काम सुरू केले आहे. 3. गावामध्ये जिल्हा परिषद शाळेची वर्गखोली मंजूर करून त्याचे बांधकाम पूर्ण केले आहे. 4. ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत मंजूर करून आणली आहे. 5. गावातील स्वच्छता करून कचरा उचलणे व त्याचे व्यवस्थापन करण्याचे काम सुरू आहे. 6. गावात सार्वजनिक ठिकाणी सौर ऊर्जेचे लाईट बसविले आहेत. 7. नाल्यांचे बांधकाम सुरू आहे. 8. गावातील कब्रस्तान चे कंपाउंड वॉलचे काम सुरू आहे.9. गावातील नवीन वस्त्यांमध्ये सिमेंट काँक्रीट रोडचे काम सुरू आहे. 10. गावातील शेतकऱ्यांना शेतात जाण्या येण्यासाठी लागणाऱ्या पांदन रस्त्याची काम सुरू आहे. 11. गावातील जिल्हा परिषद शाळा डिजिटल करून शाळेत पिण्याच्या पाण्यासाठी बोर पाडून फिल्टर बसवून पिण्याचे पाण्याची व्यवस्था केली आहे. 11. गावातील श्री. विरशप्पा महाराज मंदिर व सय्यद सादात दर्गा येथे नवीन बोर पाडून 24 तास पिण्याचे पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. 12. गावात व तांड्यावर ठिकठिकाणी हातपंप बसून गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिली. 13. सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम मंजूर करून आणले आहे. 14. मागासवर्गीय वस्तीमध्ये रोडचे व बंद नालीचे बांधकाम सुरू आहे. 15. गावामध्ये वेळोवेळी तज्ञ डॉक्टरांना बोलावून घेऊन पिढीवर उपचार करणे सुरू आहे. 16. गावातील अंगणवाड्यांना संपूर्ण साहित्य उपलब्ध करून देऊन सर्व अंगणवाड्या सुसज्ज केले आहेत. हि व इतर विकास कामे होत असताना गावातील नागरिकांचा ग्रामपंचायत मार्फत होणाऱ्या विकास कामांमध्ये सहभाग वाढावा व आमचे गाव समृद्ध, परिपूर्ण व आदर्श गाव व्हावे हा शूद्ध हेतू मनात धरुन विकासाची गंगा घरोघरी हा वसा घेतलेली ग्रामपंचायत बोरगाव आ. ता. लोहा. येथील शंभर (100) सदस्यांचा आदर्श गाव पाटोदा जिल्हा छ. संभाजीनगर पाहणी दौर लोकप्रिय आ. मा. श्यामसुंदरजी शिंदे साहेब, विधानसभा लोहा कंधार# यांच्या ग्रामविकास कसा असावा या संकल्पनेतून व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे@ यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे पॅनल प्रमुख श्री पुंडलिकराव हारजी पाटील
यांचे पुढाकारातून विकास सुरू असलेले ग्रामपंचायत कार्यालय बोरगाव आ. ता. लोहा जि. नांदेड च्या वतीने गावातील वेगवेगळ्या जाती धर्मातील व वेगवेगळ्या वयोगटातील काही ज्येष्ठ नागरिक, सरपंच,उपसरपंच व सर्व सन्माननीय सदस्य, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक प्रतिनिधी, जिल्हा परिषद शाळा शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष,तसेच गावातील सुशिक्षित गट व गावासाठी सेवाभावाने काम करणारा गट, काही नवतरुण, महिला, अंगणवाडी सेविका, अशा सेविका, महिला बचत गटाच्या सदस्या व काही विरोधी गटाचे सदस्य असे गावात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या 100 सदस्यांचे पथक
या दौऱ्यामध्ये गावातील पॅनल प्रमुख श्री. पुंडलिकराव हरजी पाटील,सरपंच सौ. कांताबाई तुळशीराम हंकारे, उपसरपंच सौ. जयश्रीताई पुंडलिकराव पाटील ग्रामपंचायत सदस्य सौ.सुशिलाबाई भीमराव पाटील, सौ. शांताबाई शेषराव पाटील, सौ. कांताबाई श्रीरंग गायकवाड, सौ. मिराबाई पांडुरंग गळेकाटू, सौ.सविता गोविंद सुरनर, श्री. कल्याण रावसाहेब पाटील, अल्लावदीन इब्राहिम शेख, ग्रामविकास अधिकारी एम. सी. सय्यद साहेब, व गावातील ज्येष्ठ नागरिक श्री. हैबतराव पाटील, श्री. शामराव पाटील, श्री. भिमराव पाटील, श्री. पांडुरंग रामजी पाटील, श्री. केशवराव पाटील, श्री. अशोक पाटील, श्री. तुळशीराम हंकारे, श्री. गंगाधर आंबेगाव, जिल्हा परिषद शाळा शिक्षक प्रतिनिधी श्री फुलसे सर, अंगणवाडी शाळा प्रतिनिधी सौ. वैशाली पाटील व सौ. नंदाताई पाटील, सौ. मुक्ताबाई श्रीसागर, सौ. सुमन पाटील, सौ. गजराबाई सुरनर, सौ. शोभाताई हंकारे, हुसेनसाब शेख, श्री. श्रीरंग पाटील गायकवाड, श्री. राजू महाराज स्वामी, श्री. राजूअण्णा आंबेगावे, श्री. गंगाधर भालेराव, श्री. व्यंकटेश पाटील, श्री. मनमत आंबेगाव, श्री. सोपान कराळे, श्री. किरण पाटील, श्री विश्वनाथआप्पा भंडारे, श्री. बालाजी आंबेगावे, श्री कैलाशअप्पा भंडारे, श्री. पांडुरंग गळेकाटू, श्री. प्रल्हाद गळेकाटू, श्री. मुंजाजी पाटील,श्री. अशोक हंकारे, श्री. उत्तम हंकारे, श्री. अशोक गळेकाटु, श्री. किसन पाटील, श्री. बालाजी दादाराव पाटील, श्री. संजय पाटील श्री. संदीप पाटील, श्री. सिद्धार्थ हंकारे, श्री. केशव लोंढे, श्री. भाऊसाहेब सुरनर, श्री संजय आंबेगावे, श्री. केशव सुरनर, श्री. मनमत आंबेगाव, श्री. विश्वनाथ आंबेगावे, श्री. प्रल्हाद माली पाटील सुरनर, श्री. गणपती पाटील, श्री. सुरेश पाटील, श्री. राजू आंबेगाव, श्री. भीमा महाराज स्वामी, श्री. सोपान कराळे, श्री. आनंदा पवार, गुलाब भाई शेख, श्री. नाथराव भालेराव, श्री. कुंडल पवार, श्री. गोविंद पवार, श्री. विठ्ठल नरवडे, श्री. सोपान नरवडे, मैनोदिन शेख, श्री. दिलीप सूर्यवंशी, सुलतान शेख, दस्तगीर शेख, श्री. शेषेराव हांकारे, श्री. प्रल्हाद हंकारे, सत्तारभाई शेख, श्री. ज्ञानोबा बुद्रुक, श्री. पितानंद हंकारे, श्री नितीन हंकारे, श्री. माधव गायकवाड, श्री. बाळू हंकारे, श्री. आप्पाराव गायकवाड, मैंनोदीन उस्मान साब शेख, श्री. विठ्ठल उर्फ पिंटू पाटील, श्री. नागन भालेराव, श्री. मंगेश पाटील, श्री.नागेश पाटील, श्री. राजकुमार पाटील, श्री. ऋषिकेश पाटील, श्री. मारुती पाटील, श्री.अजित पाटील बोरगावकर ह्या व गावातील इतर नागरिकांनी आदर्श गाव पाटोदा येतील पाहणी दौऱ्यात सहभाग नोंदविला व बोरगाव गाव हे आदर्श गाव बनविण्याचा संकल्प केला आहे.
