दैनिक चालू वार्ता कंधार ग्रा प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
सिरसी :- कंधार तालुक्यातील सिरसी (बु) ते राहाटी रस्त्या आमदार भाई केशवराव धोंडगे साहेब यांच्या काळात तयार करण्यात आला होता. पण प्रशासनाच्या वतीने या रस्त्याकडे लक्ष न दिल्याने संपूर्ण रस्त्या उखडून गेला असून सोलींग(दगड) पुर्णपणे उघडे पडले असून या रस्त्याने प्रवास करणे मुस्किल झालेले आहे. तसेच हा रस्ता सिरसी येथील नागरिकांना नांदेड येथे जाण्यासाठी सोयीचा आहे. म्हणजे सिरसी येथून जवळच आहे, सिरसी खुर्द, पेठवडज, वरवंट असे लांबून यावे लागते हे अंतर लांब पल्ल्याचे आहे. त्यामुळे कंधार तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉ. श्री. तुषार राठोड साहेब यांची भेट घेऊन सिरसी (बु.) येथील नागरिकांनी राहटी मार्गे रस्ता दुरुस्त करून देण्यासाठी निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थित सरपंच प्रतिनिधी श्री. नागेश कैलासे,उपसरपंच श्री. निवृत्ती सरोदे,सामाजिक कार्यकर्ते श्री.व्यंकटी जाधव, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन श्री. दत्ता पाटील कौंसल्ये, श्री. शिवाजी पाटील कौंसल्ये, श्री.तुकाराम पाटील येडे, श्री. बाबू पाटील कौंसल्ये, श्री. लोकडू कैलासे, श्री. गोविंद कैलासे, श्री. बाबूराव कैलासे, श्री. रमेश नवघरे हे सर्व सिरसी (बु.) येथील नागरिक उपस्थित होते.
