दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
एकंदरीत परिस्थिती पाहता भाजपाचा सत्तेचा भ्रष्ठाचार शिगेला पोहोचला असून राजकारणात नैतिकेतेचा पराभव झालाच आहे एखादा पक्षच हाय जैक करणे,पक्षाचे नाव आणि चिन्हही पळवणे हा सगळा घटनात्मक किंवा संसदीय लोकशाहीची थट्टा उडवणारा प्रकार आहे. अटलबिहारी वाजपेयी यांची उंची आताचे भाजपचे नेते गाठू शकत नाही. नैतिकतेच्या आधारे राजीनामा देण्याचा विचार ते स्वप्नातही करु शकत नाहीत. तसा प्रकार निवडणूक आयोगाकडे ही अनुभवास येत आहे.सुप्रीम कोर्टाचा निकाल समतोल साधण्याच्या प्रयत्न असल्याचे पत्रकारांशी बोलताना लातूर जिल्हा संपर्क प्रमुख तथा माजी आमदार रोहिदास चव्हाण म्हणाले. प्रसंगी जेष्ठ साहित्यिक शेषेरावजी कहाळेकर,नगरसेवक संभाजी पाटील चव्हाण,भिमराव पाटील शिंदे,माजी नगरसेवक बाबुराव डोम आदींची उपस्थिती होती.यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना रोहिदासजी चव्हाण पुढे म्हणाले कि, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा दिलेला निर्णयाने राज्यपालांच्या वर्तुणुकीवर ताशेरेही ओढले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकता पाळून राजीनामा द्यायला पाहिजे.जनमताच्या मागणीचा आदर करायला पाहिजे.सध्याचे राज्यातील सरकार हे अनैतिक व असंवैधानिक पद्धतीने स्थापन झाल्याचे सिद्ध झाले आहे. हिम्मत असेल तर या सरकारच्या मंडळींनी नैतिकता दाखवून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांप्रमाणे राजीनामा द्यावा व निवडणुकीला सामोरे जावे.असेही आपल्या खुमासदार शैलीत विरोधकांचा समाचार घेतला.
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा जनतेवर विश्वास असून आम्ही कधीही निवडणुकीला तयारच आहोत.लोकशाहीत सर्वोच्च जनताच असते जनतेच्या मनात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे स्थान कायमच आहे.राज्यातील शिंदे सरकार तत्कालीन राज्यपाल कोशारी यांनी त्यांच्या अधिकाराचा केलेला गैरवापर केंद्राचा दबाव आणि भाजपच्या मदतीनेे करण्यात आले होते. हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने देखील यावर शिक्कामोर्तब केले आहे,आता स्पष्ट झाले आहे. की हे सरकारच बेकायदेशीर, घटना बाह्य असल्याचा संविधान पीठाचा निकाल असल्याचे दिसून येत असल्याचे ही शिवसेेना ठाकरे गटाचे लातूर जिल्हा संपर्कप्रमुख तथा माजी आमदार रोहिदास चव्हाण यावेळी म्हणाले.
