दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
लातूर/अहमदपूर:- प्रधानमंत्री पुरस्कार सोहळा २०२२-२३ या वर्षी आरोग्य क्षेत्राचा मान देशात पहिला क्रमांक लातूर जिल्ह्यास प्राप्त झाला आहे.तसेच कायाकल्प पुरस्कार हा प्राथमिक आरोग्य केंद्र अंधोरी ,आरोग्य वर्धिनी उपकेंद्र खंडाळी,ढाळेगाव ,रुद्धा,उजना आदी केंद्रास प्राप्त झाला आहे.त्यामुळे जिल्हाधिकारी श्री पृथ्वीराज बी.पी.,मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अभिनव गोयल,उपसंचालक डॉ ढेले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ वडगावे साहेब आदी मान्यवरांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. वैद्यकीय अधिकारी डॉ बायस, डॉ केंद्रे ह्यांचा मार्गदर्शनाखाली समुदाय आरोग्य अधिकारी डॉ कुंभार,डॉ .नाईक ,डॉ कुटे,डॉ घोडके तसेच आरोग्य सहाय्यक श्री फड,श्री गायकवाड आरोग्य सहाय्यिका श्रीमती मुंढे, औषध निर्माण अधिकारी श्री कुलकर्णी, श्रीमती चोले, आरोग्य सेवक,आरोग्य सेविका,आशा कार्यकर्त्या आदिनी परिश्रम घेऊन महत्वाचे योगदान दिले.
