दै.चालु वार्ता वृत्तसेवा औसा-प्रतिनिधी-गणेश शिंदे
दि. 20 जानेवारी 2026 रोजी श्री कंप्युटर्स किल्लारी MKCL अधिकृत प्रशिक्षण केंद्राच्या वतीने महाराष्ट्र विद्यालय किल्लारी , इंदिरा कन्या हायस्कूल किल्लारी येथील इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांना या वर्षी होणाऱ्या बोर्ड परीक्षा बद्दल शुभेच्छा देऊन कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) Artificial Intelligence च्या जमान्यात संगणकाचे महत्व यावर सविस्तर मार्गदर्शन करून परीक्षा पॅड चे मोफत वाटप करण्यात आले.
कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (AI) आजच्या काळातील सर्वात परिवर्तनशील तंत्रज्ञानापैकी एक आहे. हे आपले जीवन, कार्यपद्धती आणि संवाद साधण्याची पद्धत बदलत आहे. एआय हे एकप्रकारे मशीनच्या रुपात मानवाप्रमाणे समस्या सोडवणे, निर्णय क्षमता, तर्कसंगतता व नवीन गोष्टी शिकण्याचे काम करते. हे MKCL ने MS-CIT कोर्स मध्ये अतिशय सोप्या पद्धतीने विश्लेषण केलेले आहे ते विद्यार्थ्यांना अतिशय मजेशीर शिकता येईल . संगणक साक्षर झाल्याशिवाय एआयची पार्श्वभूमी काय आहे? याची क्षमता व हे काय काय कार्य करू शकते? तसेच, भविष्यात यात काय बदल होऊ शकतात? उद्योग व्यवसायात , विध्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक जीवनात, शिक्षणात व इतर प्रत्येक क्षेत्रातील दैनंदिन जीवनात एआय चा वापर कसा करता येईल या बद्दल श्री कंप्युटर्स चे संचालक गणेश शिंदे यांनी मार्गदर्शन केले.
तसेच या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र विद्यालयाचे मुख्याध्यापक सोनवणे सर व इंदिरा कन्या हायस्कूल च्या मुख्याधिपिका सूर्यवंशी मॅडम यांनी परवानगी देऊन सहकार्य केले, तर प्रकाश सुभेदार सर व अनिल पवार सरांनी व इतर सर्व शिक्षकांनी विध्यार्थी हिताच्या शालेय योजना राबिवल्या बद्दल व विध्यार्थ्यांना परीक्षा पॅड चे मोफत वाटप केल्याबदल गणेश शिंदे यांचे आभार मानून अभिनंदन केले.
