दौडं तालुका प्रतिनिधी -अंकुश काळे
दौडं तालुक्यातील कुसेगाव येथिल श्री भानोबा विद्यालय या सैक्षणिक संस्था ची शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन २०२६ या अभियानांतर्गत श्री भानोबा विद्यालय कुसेगाव येथे आज विद्यालयाची तपासणी झाली सदर तपासणीसाठी नागनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री दिवेकर सर, कै. त्र्यंबक दिवेकर विद्यालय कडेठाणचे मुख्याध्यापक मा.श्री दिवेकर सर, सोनवणे सर, गोपीनाथ माध्यमिक विद्यालय वरवंड चे शिक्षक मा. श्री गवळी सर, मा.श्री बारसकर सर, नागनाथ विद्यालय वरवंडचे लिपिक श्री सय्यद सर यांनी उपस्थित राहून विद्यालयाची वार्षिक तपासणी केली. विद्यालयाच्या कामकाजाचे कौतुक करून उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले अशी तपासणी झाल्याने विध्यार्थी आणि संस्थेचा विकास आणि गुणवता सुधारून चांगले विध्यार्थी घडून समाजाला सुधारवण्याचे आणि प्रगतीचे मार्ग निवडण्यास त्यांना मदत मिळते बुद्दीला चालना मिळते याबद्दल विद्यालयाच्या वतीने आणि पालक आणि परिसरातून या अभियान चे कौतुक होत आहे संपूर्ण टिमचे मनःपूर्वक आभार.
