दैनिक चालु वार्ता वर्धा उपसंपादक – अवधूत शेंद्रे
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी प्रादेशिक व्यवस्थापक( सनियंत्रण समिती क्र. ३) श्रीकांत गभणे, विभाग नियंत्रक प्रतापसिंग राठोड विभागीय वाहतूक अधिकारी स्वाती तांबे यांची उपस्थिती
वर्धा – आर्वी – येथील बस आगारास महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे ५ नवीन प्रवासी वाहतूक बसेस दाखल झाल्या त्याचा लोकार्पण सोहळा विधानसभा आमदार सुमित वानखेडे विधान परिषद आमदार दादाराव केचे आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडला यावेळेस आमदार वानखेडे आणि आमदार केचे यांच्या हस्ते एसटी बसेसची पूजा व फीत कापून लोकार्पण करण्यात आले यानंतर या नवीन एसटी बसेस मध्ये आमदार वानखेडे, आमदार केचे, महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी यांनी बसमध्ये बसून प्रवासाचा सुखद आनंद घेतला यावेळी आर्वी आगार व्यवस्थापक आशिष मेश्राम यांच्यासह एसटी महामंडळाचे चालक, वाहक, पर्यवेक्षक आणि इतर कर्मचाऱ्यासह प्रवासी देखील उपस्थित होते
