दैनिक चालु वार्ता प्रतिनीधी –
मौ. शिराढोण येथील भुमीपुत्र श्री. नेमाजी श्रीराम देवणे यांचा जन्म सामान्य शेतकरी कुटुंबात झाला आसून श्री. नेमाजी श्रीराम देवणे यांचे प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, शिराढोण येथे झाले आहे. तसेच माध्यमिक शिक्षण हे भीमाशंकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिराढोण येथे झाले आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावातच पूर्ण करून उच्च माध्यमिक शिक्षण यशवंत महाविद्याल नांदेड याठिकाणी पूर्ण केले. त्यानंतर पदवी शिक्षण पूणे विद्यापीठ अंतर्गत कॉलेज ऑफ इंजिनियरिंग माळेगांव बारामती पुणे येथून पूर्ण करून पुण्यामध्येच राहून राज्यसेवेची तयारी केली.
Mpsc Combine 2021 मधून सहायक कक्ष अधिकारी या पदी निवड झाली. फेब्रुवारी 2023 पासून सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई येथे कार्यरत होते. त्यानंतर त्यांची राज्यसेवा 2022 मधून तहसीलदार पदी निवड झाली. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर तहसीलदार या पदी नियुक्ती आदेश प्राप्त झाला आहे. प्रशासकीय क्षेत्रातील वर्ग -1 अधिकारी प्रशिक्षणासाठी यशदा, पूणे येथे त्यांची निवड झाली आहे.
त्यांच्या या निवडीने शिराढोण वाशीयांना झालेला आनंद विलक्षण तेजस्वी आहे. यशदा मध्ये IAS अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण होत असते तिथेच श्री. नेमाजी श्रीराम देवणे यांचे प्रशिक्षण संपन्न होत आहे. इथले प्रशिक्षण रचनात्मक आणि नवनिर्माणाला अनुकूल असे सर्जनशील प्रशिक्षण असते उत्तम अधिकारी घडवण्याची अतिशय चांगली तयारी येथे केली जाते राज्यातील त्या त्या क्षेत्रातील बहू व्यासंगी विद्वान प्रशिक्षक येथे पाचारण केले जातात. या सर्वोत्तम प्रशिक्षणानंतर तहसीलदार पदावर प्रत्यक्ष कार्यानुभव घ्यावा लागतो अशा सुंदर प्रशिक्षणातून घडणारे अधिकारी निस्वार्थ, निष्कलंक आणि निर्मोही राष्ट्र सेवेसाठी तत्पर होऊन लोकसेवेसाठी समर्पित होतात. श्री. नेमाजी श्रीराम देवणे शिराढोणकर या होतकरू, उमद्या, उत्साही अधिकाऱ्यांचे शिराढोण असेच परिसरातील नागरिकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
