दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी पिंपरी चिंचवड -बद्रीनारायण घुगे
खेड तालुक्यातील तीर्थक्षेत्र येलवाडी गावचे ग्रामदैवत श्री रोकडोबा महाराज यांचा उत्सव ( ता.५ ) रोजी विविध कार्यक्रमांनी संपन्न होत आहे.या उत्सवातील सर्वात जास्त आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांचा नृत्याचा कार्यक्रम होणार आहे.त्यामुळे यंदा येलवाडी गावात मोठ्या प्रमाणात गर्दी उसळण्याची शक्यता आहे.
ग्रामदैवत श्री रोकडोबा महाराज उत्सवा निमित्त पहाटे ५ ते ७ श्री रोकडोबा महाराजांचा अभिषक व आरती ,सकाळी ७ ते ८ मांडव ढहाळे व हारतुरे ,सकाळी ८ वाजल्या पासून भव्य बैलगाडा शर्यतींना सुरुवात होणार आहे.सायंकाळी ६ वा.रोकडोबा महाराजांची आरती ,सायंकाळी ६ : ३० ते ८ श्री रोकडोबा महाराजांचा ( छबिना ) पालखीची ग्राम प्रदक्षिणा ,आणि रात्री ८ वाजता गौतमी पाटील यांचा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे.
६ एप्रिल रोजी ५ ते ७ रामनवमी निमित्त अभिषक व आरती ,सायंकाळी ४ वा. कुस्त्यांचा जंगी आखाडा ,आयोजक पै.बंटी गाडे व देणगीदार .आणि या तीन दिवसीय ग्रामदैवत रोकडोबा महाराज उत्सवाची सांगता सोमवार ( ता.७ ) रोजी जय मल्हार जागरण गोंधळ पार्टी – कर्जत यांच्या जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाने होणार आहे.
विशेष व्याख्यान : श्री छत्रपतीशिवाजी महाराज आणि आपण या विषयावर ( ता.४ ) रोजी श्री रोहित दादा जगदाळे ( धारकर ) कराड यांचे व्याख्यान होणार आहे.
एक किलो चांदीची गदा अर्पण करणार
कै. मंगल वसंतराव गाडे पाटील यांच्या स्मरनार्थ श्री अनिकेत वसंत गाडे पाटील यांच्या कडून ग्रामदैवत श्री रोकडोबा महाराज यांच्या चरणी एक किलो चांदीची गदा अर्पण करण्यात येणार आहे.
श्रीक्षेत्र येलवाडी रोकडोबा महाराज उत्सव समितीचे विध्यमान सरपंच रणजित गाडे , विनोद गाडे ( अध्यक्ष ) दत्तात्रय बोत्रे ( उपाध्यक्ष ),वैभव गाडे ( खजिनदार ),प्रशांत गाडे ( सदस्य )अक्षय गाडे , सुनील राऊत ,सौरभ गाडे ,तुषार गाडे ,विकास गाडे,बाळासाहेब गाडे ,हरेश गाडे ,संदीप पायगुडे ,शरद गाडे ,आदित्य गाडे ,महेश गाडे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.हा श्री रोकडोबा महाराज उत्सव रोकडोबा महाराज उत्सव समिती ,व समस्त ग्रामस्थ श्रीक्षेत्र येलवाडी यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आला आहे.
