दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी -अविनाश देवकते
लातूर (उदगीर) :भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) उदगीर शहर व ग्रामीण मंडळातील नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत. या निवडींमुळे पक्ष संघटनेला नवे नेतृत्व लाभले असून, स्थानिक राजकारणात नव्या दमाची झळाळी जाणवणार आहे.
उदगीर शहराध्यक्षपदी अमोल अनकल्ले यांची निवड झाली असून, तालुकाध्यक्षपदी सुनील सावळे यांना जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच, उदगीर ग्रामीण पूर्व मंडळाचे नेतृत्व रामदास विनायकराव बेंबडे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. या निवडी सोमवारी (ता. २१ एप्रिल) रोजी झालेल्या बैठकीत करण्यात आल्या.
ही निवड प्रक्रिया भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. निवड प्रक्रियेसाठी भारत चामे, गोविंदराव चिलकुरे, व सोमेश्वर सोप्पा हे तीन निवडणूक निरीक्षक उपस्थित होते.
या वेळी कार्यक्रमास माजी आमदार गोविंद केंद्रे, बापूराव राठोड, पंडित सूर्यवंशी, झुंजार पाटील, विजय पाटील, उत्तराताई कलबुर्गे, बालाजी गवारे, हणमंतराव हंडरगुळे, गणेश गायकवाड, उदयसिंग ठाकूर, अमोल निडवडे, रतिकांत आंबेसंगे, शिवानंद हैबतपुरे, भागवत गुरमे, राहुल आंबेसंगे यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नविन नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून, पक्षसंघटनेला बळकटी देण्यासाठी ते पुढे कसोशीने काम करतील, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.
—
