दैनिक चालु वार्ता पाटोदा (प्रतिनीधी): सुनिल तांदळे
पाटोदा (बीड): पाटोदा तालुक्यातील येवलवाडी (ना.) येथील सुरु असलेली बस सेवा येवलवाडी ते येवलवाडी फाटा या रस्त्याच्या सुरु असलेल्या कामामुळे बंद करण्यात आली होती. सदर रस्त्याचे काम पुर्ण होवुन देखील बस सेवा सुरु करण्यात छोटो मोठे अडथळे येत असल्याने बस सुरु करण्यात येत नव्हती, यामुळे पाटोदा येथे शिक्षण घेत असलेल्या शालेय विद्यार्थ्यांना पायपीट करत शाळेत जावे लागत होते.
“ग्रामस्थांनी केलेले प्रयत्न मोलाचे!”
रस्त्याच्या कामामुळे बंद झालेली बस सेवा सुरळीत सुरु होण्यासाठी निर्माण झालेल्या अडचणी लक्षात घेवुन बस थांबा कुठे असावा? बस वळवण्यासाठी येत असलेली अडच लक्षात घेवुन रस्त्यालगत असलेली गोरख बांगर यांची जागा योग्य असल्याचे पाहुन गावातील तरुण (सुरज नागरगोजे, कपील नागरगोजे, अशोक नागरगोजे, सुरेश नागरगोजे, प्रभाकर नागरगोजे इ.) व ग्रामस्थ यांच्या पुढाकाराने स्व खर्चाने व श्रमादानाने बस थांबा उभा करुन बस वळवण्यायोग्य जागा उपलब्ध करण्यात आली.
“विद्यार्थ्यांची पायपीट संपली!”
आज दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजी येवलवाडी ते पाटोदा बस सेवा सुरु झाल्याने गावातील नागरीक व शालेय विद्यार्थी यांची पायपीट संपली असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. मोठ्या प्रतिक्षेनंतर आज पहिल्यांदाच बस गावात आल्यानंतर बस थांब्याजवळ बस चे स्वागत करण्यासाठी श्री. लहु नागगोजे, श्री. गोरख बांगर, श्री. रामप्रभु वनवे, श्री. भागवत गिते, श्री. सुरेश नागरगोजे यांच्यासह तरुण व शालेय विद्यार्थी मोठ्या संखेने हजर होते.
