ठाणे-प्रतिनिधी-नागेश पवार
(दिवा)- आज मुंबईसह सर्वच महानगर पालिकेचे महापौर पदाचे आरक्षण सोडत काढण्यात आले. मुंबईला सर्वसाधारण तर ठाणे महानगर पालिकेवर SC आरक्षण निश्चित करण्यात आले, ठाणे महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर झाल्यावर लगेचच समर्थकांनी आपापल्या परीने सोशल मीडियावर इच्छुकांची लाट उसळवली आहे.
समस्यांचे माहेरघर समजले जाणाऱ्या दिवा शहरातील समस्यांवर मात करण्यासाठी प्रभाग क्रं.२८ (अ) च्या SC आरक्षित जागेवर निवडून आलेले नगरसेवक मा.दीपक नामदेव जाधव यांना महापौर करण्यात यावे, अशी मागणीही सोशल मीडियावर आता जोर धरत आहे.
