म्हाळुंगे नाणेकर गटातील उमेदवारांच्या प्रचाराचा दणदणीत शुभारंभ उमेदवार अर्ज दाखल

खेड प्रतिनिधी
बद्रीनारायण घुगे
: जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६च्या राष्ट्रवादी अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आज म्हाळुंगे नाणेकर गटातील येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषी वातावरणात झाला. सकाळपासूनच गावात राजकीय हालचालींना वेग आला होता. ढोल-ताशांचा गजर, घोषणांचा निनाद आणि घड्याळ चिन्हाने सजलेली उपरणी यामुळे सावरदरी अक्षरशः आनंदाचे वातावरण झाले होते. राष्ट्रवादी आजच्या प्रचाररॅलीतून निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे स्पष्ट संकेत दिले.
प्रचाराच्या शुभारंभापूर्वी उमेदवारांनी येलवाडी सावरदरी म्हाळुंगे गावचे आराध्य दैवत जोपाईदेवी तसेच माता यांचे दर्शन घेतले. देवदर्शनानंतर विजयासाठी आशीर्वाद मागत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भव्य रॅली काढण्यात आली. धार्मिक परंपरा आणि राजकीय संकल्प यांचा सुरेख संगम या प्रसंगी पाहायला मिळाला. ‘देवाच्या कृपेने आणि जनतेच्या पाठबळावर विजय निश्चित’ असा विश्वास उमेदवारांच्या चेहऱ्यावर झळकत होता.
या रॅलीत म्हाळुंगे नाणेकर जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार गणेश बोत्रै पंचायत समिती गणाचे आश्विनताई तरस तसेच प्रमुख उपस्थिती होती. उमेदवारांसोबत राष्ट्रवादी ज्येष्ठ पदाधिकारी, स्थानिक नेते, माजी लोकप्रतिनिधी तसेच असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. रॅलीतील शिस्तबद्ध सहभाग आणि मोठी गर्दी राष्ट्रवादी संघटनात्मक ताकद अधोरेखित झाली.
रॅलीदरम्यान म्हाळुंगे नाणेकर गावातील सर्व वयोगटांतील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. महिला भगिनींनी पारंपरिक वेशात सहभाग नोंदवत रॅलीची शोभा वाढवली, तर युवक-युवतींनी घोषणा देत वातावरण अधिक भारावून टाकले. ज्येष्ठ नागरिकही या रॅलीत उत्साहाने सहभागी झाले होते. अनेकांच्या घड्याळ चिन्ह असलेली उपरणी झळकत होती, तर दुचाकी वाहनांव घड्याळ झेंडे फडकत होते. रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून ग्रामस्थांनी रॅलीचे स्वागत करत उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी उमेदवारांनी उपस्थित जनसमुदायास अभिवादन केले. ‘गावाचा सर्वांगीण विकास, पारदर्शक कारभार आणि सामान्य माणसाला न्याय देणे हेच आमचे ध्येय आहे,’ असे मत उमेदवारांनी व्यक्त केले. केंद्र व राज्य सरकारच्या विविध विकासकामांचा उल्लेख करत, त्या योजनांचा लाभ तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावर घडयाळ प्रतिनिधी असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी निवडणुकीत विजयासाठी त्यांनी नागरिकांकडे आशीर्वाद मागितले.
नागरिकांनीही उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत जोरदार पाठिंबा दर्शविला. टाळ्यांच्या कडकडाटात आणि घोषणांच्या गजरात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
“घडयाळ चिन्हासमोरील बटन दाबून सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा,” खेड आमदार दिलीप मोहिते असे आवाहन यावेळी करण्यात आले. राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांच्या एकजुटीचा
संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला
विजय निश्चित म्हाळुंगे नाणेकर गटातील गणेश बोत्रै आश्विनताई तरस यांचा आहे
