त्यांच्या सारखा अडाणी लीडर मी नाही…
राजन विचारे यांना आपली हार पचली नाही. लोकांमध्ये आपली हार पचवता आली नाही, लोकांपासून स्वत:चा चेहरा कसा लपवायचा, याकरिता थातूरमातूर कारणे काढून कोर्टात याचिका दाखल केली.
परंतु, पळकुटा बाजीराव अशा पद्धतीने विचारे यांची वागणूक असून मी त्यांच्या सारखा अडाणी लीडर नाही, अशी टीका खासदार नरेश म्हस्के यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी खासदार राजन विचारे यांना लगावला.
राजन विचारे यांनी नरेश म्हस्के यांच्या खासदारकीला आव्हान देत न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र ही याचिका न्यायलयाने फेटाळली. त्यानंतर नरेश म्हस्के यांनी विचारे यांच्यावर टीकेची झोड उठवली. माझ्या खासदारकीवर शिक्कामोर्तब झाले आहे. दोन लाख १७ हजार मतांच्या फरकाने मी निवडून आलो. सात लाख ३४ हजार मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवला. देशातील पहिल्या दहा जागांमध्ये सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणाऱ्या मतदारसंघात ठाण्याचा समावेश आहे, असे ते म्हणाले.
राजन विचारे यांना आपली हार पचली नाही. आपली हार लपवण्यासाठी त्यांनी थातूरमातूर कारणे काढून कोर्टात याचिका दाखल केली. मात्र, कोर्टाने दूध का दूध, पाणी का पाणी करून दिले आहे. विद्यार्थी दशेपासून पक्षाकरिता आंदोलन केले, लाठ्या- काठ्या खाल्ल्या, हे करत राजकारणात आलो, असे देखील म्हस्के यांनी सांगितले.
तो आरोप जाहीरपणे सांगा…
माझ्यावर कोणताही भ्रष्टाचाराचा किंवा चोरीचा गुन्हा नाही. ज्या गुन्हासाठी विचारे माझ्या विरोधात न्यायालयात गेले तो त्यांनी सांगावा. त्यांनी ज्याचा न्यायलयात उल्लेख केला आहे ती पक्षाकरिता केलेली गोष्ट असून ती सांगायला लाज वाटते का? असा सवाल देखील म्हस्के उपस्थित केला. सत्य परेशान हो सकता है, अपराजित हो नहीं सकता, हेच खरे. असल्याचे त्यांनी सांगितले.
आधी आपला पक्ष सांभाळा
संजय राऊत यांच्या सल्ल्याने बालिश चाळे केले जात आहेत. नरेंद्र मोदींचे नाव घेण्याचीही त्यांची पात्रता नाही. आधी आपला पक्ष सांभाळा, असा सल्ला त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला. आपल लावलेले कुंक लोक पुसत आहे, नगरसेवक, पदाधिकारी, आमदार तुमचं रोजचं लावलेलं कुंकू पुसून दुसऱ्याच्या घरी सुखाने नांदायला जात आहेत. आधी आत्मपरीक्षण करा आणि मग पंतप्रधाना कुंकू पाठवा, असे म्हस्के म्हणाले.
