दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा उमरखेड तालुका प्रतिनिधी/प्रवीण कनवाळे-
तालुक्यातील उमरखेड ते पुसद राष्ट्रीय महामार्गावरील कुपटी या गावाजवळ दि.19 रोजी संध्याकाळी नऊ वाजता च्या दरम्यान दोन युवकांचा अज्ञात वाहणाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला असून मृतक तरुणाची नावे विनायक काळे व चंद्रकांत सखाराम कऱ्हाळे रा.अंबाळी असुन ते आपल्या टू व्हीलर क्रमांक (एम.एच.29 सी.एच.4037) या वाहनाने उमरखेड वरून आपली कामे आवरुन आपल्या मूळगावी अंबाळी या ठिकाणी परत जात असताना मार्गावरील कुपटी या गावाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये दोन्ही युवकांचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती तेथील गावकऱ्यांनी पोफाळी पोलीस स्टेशनला देण्यात आली,दोन्ही युवकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय उमरखेड नेण्यात आला, या दुःखत घटनेने अंबाळी गावात शोककळा पसरली आहे.
