400 बँक खात्यांची तपासणी होणार; 130 खाती उघडून कोट्यवधींचा व्यवहार..
नाशिक मधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याचे मल्टी कारनामे समोर येत आहे. महिलांचे शोषणातून, राजकीय संपर्कात त्याने कोट्यवधींची माया गोळा केली. या आर्थिक व्यवहारासाठी त्याने, पतसंस्थांमध्ये एकाच दिवशी शेकडो खाती पीडितांची उघडून घेतली.
तसंच अशोक खरातशी निगडीत 400 बँक खात्यांची तपासणीची तयारी अहिल्यानगर पोलिसांनी केली आहे. या बँक खात्यांमधून काळा पैशांचा व्यवहार झाल्याची संशय असून, अहिल्यानगर पोलिसांनी त्याअनुषंगाने तपास सुरू झाला आहे.
शिर्डी (Shirdi) पोलिस ठाण्यात अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात हिच्यासह पाच जणांविरोधात बेकायदेशीर सावकारकीचा गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यानंतर पोलिसांनी अशोक खरात याच्या बँक व्यवहारांची माहिती खणून काढत असून, त्यात धक्कादायक अशी माहिती समोर येत आहे.
अशोक खरात याने एकाच वेळी 130 पेक्षा जास्त बँक खाती एका पतसंस्थेत एका दिवसात उघडलीत. ही बँक (Bank) खाती वेगवेगळ्या लोकांच्या नावांनी असून, या बँक खात्यातून पैशांचा वापर काळ्या व्यवहारासाठी झाल्याची माहिती समोर येत आहे. या सर्व बँक खात्यांना अशोक खरात स्वतः वारसदार आहे. या बँक खात्यांना लोकांचे पॅन आणि आधारकार्ड जोडले असले तरी, सर्व खात्यांना त्याने स्वतःचा मोबाईल क्रमांक जोडलेला आहे.
या बँक खात्यावर खोट्या स्वाक्षरी असल्याचेही समोर येत आहे. या सर्व व्यवहारात संबंधित पतसंस्थाचे कर्मचारी आणि व्यवस्थापनाचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. पीडित महिला, त्यांचे नातेवाईक यांच्या नावाने बँक खाती उघडण्यात आली आहेत. अशोक खरात याच्याशी निगडीत तब्बल 400 बँक खात्यांची तपासणी चालू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि श्रीरामपूर पोलिस ठाण्याचे अतिरीक्त अधीक्षक सोमनाथ,
अशोक खरात याचे परदेशी हवाला व्यवहार देखील समोर येत आहे. याशिवाय त्याच्या मुलाकडे पोलिसांनी केलेल्या चौकशीत दररोज मोठ्याप्रमाणात घरी कॅश यायची. ही कॅश पुढे कशी अन् कशा मार्फत फिरायची, याचा तपास पोलिस यंत्रणा करत आहेत. अशोक खरात याच्याकडील दररोजच्या येणाऱ्या कॅश डिलव्हरमागे काही राजकीय संबंध असू शकतात, असा पोलिसांना संशय आहे. यातूनच 400 बँक खाती तपासाबाबत पोलिसांकडून गोपनीयता पाळली जात असल्याचे बोलले जात आहे.
